११४. आणि इब्राहीमचे आपल्या पित्याकरिता माफीची दुआ-प्रार्थना करणे हे केवळ त्या वचनाच्या सबबीवर होते, जे त्यांनी आपल्या पित्यास दिले होते, मग जेव्हा त्यांना ही गोष्ट स्पष्टतः कळाली की तो (पिता) अल्लाहचा शत्रू आहे, तेव्हा ते त्याच्यापासून दूर झाले. वास्तविक इब्राहीम मोठे कोमलहृदयी सहनशील होते.