५८. आणि जेव्हा आमचा आदेश येऊन पोहोचला, तेव्हा आम्ही हूदला आणि त्याच्या ईमानधारक साथीदारांना आपल्या खास दया-कृपेने सुटका प्रदान केली आणि आम्ही त्या सर्वांना भयंकर (सक्त) शिक्षा-यातनेपासून वाचविले.१
____________________
(१) सक्त शिक्षेशी अभिप्रेत तीच वादळाची शिक्षा होय, ज्याद्वारे हजरत हूद (अलै.) यांचा जनसमूह आदला नष्ट केले गेले आणि ज्यापासून हजरत हूद आणि त्यांच्यावर ईमान राखणाऱ्यांना वाचविले गेले.