७८. आणि त्याच्या जनसमूहाचे लोक त्यांच्याकडे धावत आले. ते तर आधीपासूनच वाईट कामात मग्न होते. (लूत) म्हणाले की, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! माझ्या या मुली आहेत, ज्या तुमच्यासाठी फार साफसुथऱ्या आहेत. अल्लाहचे भय राखा आणि मला माझ्या पाहुण्यांबाबत अपमानित करू नका. काय तुमच्यात एकही भला माणूस नाही?