८८. शुऐब म्हणाले, हे माझ्या जातीबांधवांनो! पाहा, जर मी आपल्या पालनकर्त्यातर्फे स्पष्ट प्रमाणासह आहे आणि त्याने आपल्याकडून चांगली रोजी (अन्नसामुग्री) देऊन ठेवली आहे. माझी कधीही ही इच्छा नाही की तुम्हाला मनाई करून स्वतः त्या गोष्टीकडे झुकावे जिच्यापासून तुम्हाला रोखत आहे. माझा इरादा तर आपल्या कुवतीनुसार सुधारणा करण्याचाच आहे, आणि माझी सुबुद्धी (तौफीक) अल्लाहच्याच मदतीने आहे. त्याच्यावरच माझा भरोसा आहे, आणि त्याच्याकडेच मला परतून जायचे आहे.