१८. काय तुम्ही नाही पाहात की अल्लाहच्या समोरच सजदा करतात जे आकाशात आहेत आणि जमिनीवर आहेत. त्याचप्रमाणे सूर्य, चंद्र, तारे, पर्वत, वृक्ष, पशू आणि सजीव१ आणि अनेक मानव देखील. होय बहुतेक असेही आहेत, ज्यांना (अल्लाहची) शिक्षा- यातना लागू झाली आहे आणि ज्याला अल्लाह अपमानित करेल, त्याला मान-प्रतिष्ठा देणारा कोणी नाही, अल्लाह जे इच्छितो ते करतो.
____________________
(१) काही भाष्यकारांच्या मते या सजद्याशी अभिप्रेत त्या सर्व वस्तूंचे अल्लाहच्या हुकुमा अधीन होणे आहे. कोणाची मजाल नाही की अल्लाहच्या आदेशाची अवज्ञा करू शकेल. त्यांच्या मते सजदा आणि ुपासना आणि वंदनाच्या अर्थाने नाही, जो केवळ अक्कलवान जिवंत असलेल्यांकरिता खास आहे. वास्तविक काही भाष्यकारांनी यास कल्पनेऐवजी खऱ्या अर्थाने घेतले आहे की समस्त सृष्टीतील प्रत्येक सजीव निर्जीव वस्तू आपापल्या पद्धतीने सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या समोर माथा टेकत आहे.


الصفحة التالية
Icon