३१. आणि ईमान राखणाऱ्या स्त्रियांना सांगा की त्यांनीही आपली नजर झुकलेली ठेवावी आणि आपल्या शील-अब्रुचे रक्षण करावे. आणि आपल्या शोभा- सजावटी (शृंगारा) ला उघड करू नये. त्याच्याखेरीज जे उघड आहे, आणि आपल्या छातीवर आपल्या ओढण्या- दुपट्टे पूर्णतः पसरवून राखावेत आणि आपला शृंगार कोणाच्याही समोर जाहीर करू नये खेरीज आपल्या पतीच्या किंवा आपल्या पित्याच्या किंवा आपल्या सासऱ्याच्या, किंवा आपल्या पुत्राच्या किंवा आपल्या पतीच्या पुत्रांच्या, किंवा आपल्या भावांच्या किंवा पुतण्यांच्या किंवा आपल्या भाच्यांच्या, किंवा आपल्या सखींच्या किंवा दासांच्या किंवा नोकरांपैकी अशा पुरुषांच्या ज्यांना कामवासना नसावी, किंवा अशा लहान मुलांच्या, जे स्त्रियांच्या गुप्त बाबींशी अद्याप परिचित झाले नसावेत, आणि अशा प्रकारे त्यांनी आपले पाय (जमिनीवर) जोरजोराने आपटत चालू नये की (तशाने) त्यांचा लपलेला शृंगार कळून यावा. आणि हे ईमान राखणाऱ्यांनो, तुम्ही सर्वच्या सर्व अल्लाहच्या दरबारात माफी मागा, यासाठी की तुम्ही सफलता प्राप्त करावी.


الصفحة التالية
Icon