३५. अल्लाह आकाशांचा आणि जमिनीचा नूर (प्रकाश) आहे. त्याच्या नूरचे उदाहरण असे की जणू एखाद्या कोनाड्यात दिवा आहे आणि तो दिवा काचेच्या (कंदीलाच्या) आत असावा. काच चकाकताना, लख्ख चमकणाऱ्या ताऱ्यासमान असावा आणि तो दिवा पवित्र वृक्ष जैतूनच्या तेलाने प्रज्वलित केला जात असावा, जो वृक्ष ना पूर्वेकडचा आहे, ना पश्चिमेकडचा आणि ते तेल प्रकाशमान होण्याच्या बेतात असावे आगीने त्याला कधी स्पर्श केला नसला तरी. प्रकाशावर प्रकाश आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाह आपल्या नूरच्या दिशेने ज्याला इच्छितो मार्गदर्शन करतो. लोकांना समजावण्याकरिता अल्लाह हे उदाहरण देत आहे आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीची अवस्था चांगल्या प्रकारे जाणतो.


الصفحة التالية
Icon