१५. तुम्ही सांगा, काय हे अधिक चांगले आहे१ की ती कायमस्वरूपी जन्नत, जिचा वायदा नेक- सदाचारी लोकांना दिला गेला आहे, जो त्यांचा मोबदला आहे आणि त्यांच्या परतीचे मूळ ठिकाण आहे.
____________________
(१) ‘‘हे....’’ संकेत आहे जहन्नमच्या शिक्षा- यातनेच्या वर्णनाकडे ज्यात जहन्नमी लोक जखडलेले असतील, तेव्हा इन्कार आणि मूर्तीपूजेचा हा मोबदला चांगला की ती सदैवकालीन जन्नत जिचा वायदा अल्लाहने, आपले भय राखणाऱ्यांना त्यांचे भय राखण्याबद्दल आणि अल्लाहचे आज्ञापालन केल्याबद्दल दिला आहे. अर्थात हा प्रश्न जहन्नममध्ये विचारला जाईल. परंतु इथे या हेतुने उल्लेखिला गेला की कदाचित जहन्नमी लोकांच्या या परिणामाने बोध प्राप्त करून अल्लाहचे भय आणि त्याच्या आदेशांचे पालन करण्याचा मार्ग अंगीकारतील आणि या दुष्परिणतीपासून आपला बचाव करतील जिचा उल्लेख या ठिकाणी केला गेला आहे.


الصفحة التالية
Icon