७६. कारुन मूसाच्या जनसमूहापैकी होता, परंतु तो त्याच्यावर अत्याचार करू लागला होता. आम्ही त्याला एवढा प्रचंड खजिना देऊन ठेवला होता की कित्येक शक्तिशाली लोक मोठ्या कष्टाने त्याच्या चाव्या उचलू शकत होते. एकदा त्याच्या जनसमूहाच्या लोकांनी त्याला म्हटले की दिमाख दाखवू नकोस. अल्लाह, दिमाख दाखविणाऱ्यांशी प्रेम करीत नाही.