५३. हे ईमान राखणाऱ्या लोकांनो! जोपर्यंत तुम्हाला (आत येण्याची) अनुमती दिली जात नाही, तोपर्यंत तुम्ही पैगंबराच्या घरात प्रवेश करू नका. भोजनाकरिता अशा वेळी की भोजन तयार होण्याची प्रतीक्षा करीत राहावे, किंबहुना जेव्हा बोलाविले जाईल, तेव्हा जा आणि जेव्हा भोजन करू घ्याल तेव्हा निघण्याची तयारी करा. तिथेच (बसून) गप्पा गोष्टीत मग्न होऊ नका. पैगंबराना तुमच्या या कामाचा त्रास होतो, परंतु ते तुमचा आदर (संकोच) करतात, आणि अल्लाह सत्य गोष्ट सांगण्यात कोणाचीही पर्वा करीत नाही, आणि जेव्हा तुम्ही पैगंबराच्या पत्नींकडून एखादी वस्तू मागाल तर पडद्याआडून मागा. तुमच्या आणि त्यांच्या हृदयांकरिता पुर्ण पवित्रता हीच आहे. तुमच्यासाठी हे योग्य नव्हे की तुम्ही अल्लाहच्या पैगंबरास त्रास द्यावा आणि ना तुमच्यासाठी हे उचित आहे की पैगंबर (स.) यांच्यानंतर त्यांच्या पत्नींशी विवाह करावा (लक्षात ठेवा) अल्लाहजवळ हे महाभयंकर (पाप) आहे.