१४. मग जेव्हा आम्ही त्यांच्यावर मृत्युचा आदेश पाठविला, तेव्हा ती खबर (जिन्नांना) कोणीही दिली नाही, वाळवीच्या किड्याखेरीज, जो त्यांची लाठी खात होता. तर जेव्हा (सुलेमान) खाली कोसळले, त्या क्षणी जिन्नांनी जाणून घेतले की जर ते अपरोक्ष ज्ञान बाळगत असते तर या अपमानाच्या शिक्षेत पडून राहिले नसते.१
____________________
(१) हजरत सुलेमान यांच्या काळात जिन्नांविषयी ही धारणा प्रसिद्ध होती की ते अपरोक्षाचे ज्ञान बाळगतात. अल्लाहने हजरत सुलेमानच्या माध्यमाने या भ्रमाचे पितळ उघडकीस आणले.


الصفحة التالية
Icon