१५. त्या जन्नतचे वैशिष्ट्य, जिचा वायदा अल्लाहचे भय राखणाऱ्या लोकांशी केला गेला आहे, असे आहे की तिच्यात (शीतल) जलप्रवाह वाहत आहेत, ज्यांना दुर्गंध नाही आणि दुधाच्या नद्या आहेत, ज्यांचा स्वाद बदलणार नाही. आणि मद्याचे प्रवाह आहेत. ज्यांच्यात पिणाऱ्यांकरिता खूप स्वाद आहे आणि स्रच्छ निर्भेळ मधाचे प्रवाह आहेत, आणि त्यांच्यासाठी तिथे प्रत्येक प्रकारचे मेवे (फळ) आहेत, आणि त्यांच्या पालनकर्त्यातर्फे क्षमा आहे, काय हे त्या लोकांसमान आहेत, जे नेहमी आगीत राहणारे आहेत आणि ज्यांना खूप गरम उकळते पाणी पाजले जाईल, जे त्यांच्या आतडींचे तुकडे तुकडे करील.