३. तोच आद्य आणि तोच अंतिम आहे, तोच उघड आणि तोच लपलेला आहे आणि तो प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणणारा आहे.१
____________________
(१) तोच प्रथम म्हणजे त्याच्या आधी काहीच नव्हते. तोच अंतिम म्हणजे त्याच्या नंतर काहीच नसेल, तोच उघड म्हणजे तो सर्वांवर वर्चस्वशाली आहे. त्याच्यावर कोणी वर्चस्व राखू शकत नाही, तोच गुप्त म्हणजे लपलेल्या सर्व गोष्टी तो चांगल्या प्रकारे जाणतो, ज्या लोकांच्या नजरेपासून आणि त्यांच्या बुद्धीपासून लपलेल्या आहेत. (फतहुल कदीर)


الصفحة التالية
Icon