११. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्हाला सांगितले जाईल की सभा-बैठकांमध्ये जरा विस्तारपूर्वक बसा, तेव्हा तुम्ही जागा व्यापक करा. अल्लाह तुम्हाला विस्तार प्रदान करेल आणि जेव्हा सांगितले जाईल की उठून उभे राहा, तेव्हा तुम्ही उठून उभे राहा. १ अल्लाह तुमच्यापैकी त्या लोकांचे, ज्यांनी ईमान राखले आहे व ज्यांना ज्ञान दिले गेले आहे, दर्जा उंचाविल आणि अल्लाह (ते प्रत्येक कर्म) जे तुम्ही करीत आहात, (चांगल्या प्रकारे) जाणतो.
____________________
(२) यात ईमानधारकांना सभा-संमेलनाचे शिष्टाचार सांगितले जात आहेत. इथे सभा (मजलिस) शी अभिप्रेत ती सभा, ज्यात ईमान राखणारे भलाई व नेकी प्राप्त करण्यासाठी जमले असावेत. सभा शिक्षा-दीक्षा हेतुस्तव असो किंवा जुमा (शुक्रवार) ची असो (तफसीर अल कुर्तबी) विस्तारपूर्वक बसा याचा अर्थ सभेचे क्षेत्र संकुचित राखू नका की ज्यामुळे नंतर येणाऱ्यांना उभे राहावे लागावे, किंवा इतरांना हटवून जागा करणे भाग पडावे. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले, कोणीही दुसऱ्या माणसाला हटवून त्याच्या जागी बसू नये. यास्तव सभेचे क्षेत्र विस्तृत करा (सहीह बुखारी, किताबुल जुमआ, बाबु मुस्लिम, किताबुस सलाम)