१०. आणि (त्यांच्यासाठी) जे त्यांच्यानंतर आले, जे म्हणतील की, हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला माफ कर आणि आमच्या त्या बांधवांनाही, ज्यांनी आमच्या आधी ईमान राखले आहे आणि ईमान राखणाऱ्यांच्याविषयी आमच्या मनात कपट (आणि वैरभावना) आणू नको. हे आमच्या पालनकर्त्या! निःसंशय, तू प्रेम आणि दया करणारा आहे.
____________________
(१) हदीसमधील उल्लेखानुसार माणसाने मनाच्या इच्छा आकांक्षांपासून दूर राहिले पाहिजे कारण याच मनोकांक्षांनी पूर्वीच्या लोकांना बरबाद केले, त्यांना रक्तपात करण्यास प्रवृत्त केले आणि त्यांनी अवैध (हराम) गोष्टींना वैध (हलाल) ठरवून घेतले. (सहीह मुस्लिम, किताबुल बिर्र, बाबु तहरीमिज, जुल्मे)


الصفحة التالية
Icon