२३. तोच अल्लाह आहे, ज्याच्याखेरीज कोणी सच्चा माबूद (उपास्य) नाही. मालक (स्वामी) अतिशय पवित्र, सर्व व्यंग दोषांपासून मुक्त शांती (सलामती) प्रदान करणारा, संरक्षक, वर्चस्वशाली, शक्तिशाली, महानतम पवित्र आहे अल्लाह त्या गोष्टींपासून ज्यांना हे त्याचा सहभागी ठरवितात.