१०. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुमच्याजवळ ईमान राखणाऱ्या स्त्रिया देशत्याग करून येतील, तेव्हा तुम्ही त्यांची परीक्षा घेत जा. वस्तुतः त्यांच्या ईमानास चांगल्या प्रकारे जाणणारा तर अल्लाहच आहे, परंतु जर त्या तुम्हाला ईमान राखणाऱ्या वाटतील, तर मग तुम्ही त्यांना काफिरांकडे परत पाठवू नका. या त्यांच्यासाठी हलाल (वैध) नाहीत आणि ना ते यांच्यासाठी हलाल आहेत, आणि जो काही खर्च त्या काफिरांनी केला असेल, तो त्यांना देऊन टाका, त्या स्त्रियांना त्यांचा महर अदा करून त्याच्याशी विवाह करून घेण्यात तुमच्यावर कसलाही गुन्हा नाही. आणि काफिर स्त्रियांच्या विवाहबंधनास आपल्या कब्जात ठेवू नका आणि जो काही खर्च तुम्ही केला असेल तो मागून घ्या आणि जो काही खर्च त्या काफिरांनी केला असेल, तो त्यांनीही मागून घ्यावा. हा अल्लाहचा फैसला आहे, जो तुमच्या दरम्यान करीत आहे आणि अल्लाह जाणणारा (आणि) हिकमत बाळगणारा आहे.