१०. हे ईमान राखणाऱ्यांनो! काय मी तुम्हाला तो व्यापार दाखवू जो तुम्हाला कष्ट यातनादायक शिक्षा-यातनेपासून वाचविल.१
____________________
(१) हे कर्म (अर्थात ईमान राखणे व जिहाद करणे) व्यापार या अर्थाने घेतले आहे, कारण याच्यातही त्यांना व्यापारासारखा लाभ होईल आणि तो लाभ कोणता आहे? जन्नतमध्ये प्रवेश आणि जहन्नमपासून मुक्ती. तेव्हा याहून मोठा लाभ आणखी काय असेल? याच गोष्टीला दुसऱ्या एका ठिकाणी अशा प्रकारे सांगितले गेले आहे- ‘इन्नल्लाहस्तरा मिनल्मुअ्‌मिनीन अ्‌्‌न्फ़ुसहुम्‌ व अम्वालहुम्‌ बिअन्‌न लहुमुल्जन्नत.’ ‘‘अल्लाहने ईमान राखणाऱ्यांशी त्यांच्या प्राणआंचा व संपत्तीचा सौदा जन्नतच्या बदल्यात केला आहे.’’ (सूरह तौबा-१११)


الصفحة التالية
Icon