५. ज्या लोकांना तौरातनुसार काम करण्याचा आदेश दिला गेला, परंतु त्यांनी तो अमलात आणला नाही, त्यांचे उदाहरण त्या गाढवासारखे आहे ज्याने (पाठीवर) अनेक ग्रंथ लादलेले असावेत.१ अल्लाहच्या आयतींना याला खोटे ठरविणाऱ्यांचे फार वाईट उदाहरण आहे आणि अल्लाह अशा जुलमी लोकांना मार्गदर्शन करीत नाही.
____________________
(१) हे कर्महीन यहुद्यांचे उदाहरण दिले गेले आहे ज्याप्रमाणे गाढवाला ज्ञान नसते की त्याच्या पाठीवर जे ग्रंथ लादलेले आहेत, त्यांच्यात काय लिहिले आहे किंवा त्याच्यावर ग्रंथ लादले आहेत की केरकचरा. हाच प्रकार यहुद्यांचा आहे. हे तौरात ग्रंथ बाळगतात त्याच्या पठणाच्या व स्मरणात राखण्याच्या गोष्टीही करतात, परंतु त्याला ना समजून घेतात ना त्याच्या आदेशानुसार आचरण करतात, उलट त्यात फेरबदल आणि उलटसुलट करण्याचे काम करतात. यास्तव ते गाढवापेक्षाही खालच्या दर्जाचे आहेत.


الصفحة التالية
Icon