७. धनवानाने आपल्या धन (सामर्थ्या) नुसार खर्च केला पाहिजे, आणि ज्याची जीविका (रोजी) त्याच्यासाठी कमी केली गेली असेल तर अल्लाहने जे काही त्याला देऊन ठेवले आहे, त्यातून त्याने (आपल्या सामर्थ्यानुसार) द्यावे, कोणत्याही माणसावर अल्लाह ओझे ठेवत नाही, परंतु इतकेच जेवढे सामर्थ्य त्याला दिले गेले आहे. अल्लाह गरीबीनंतर धन देखील प्रदान करेल.