१२. अल्लाह तो आहे, ज्याने सात आकाश बनविले आणि त्याचप्रमाणे जमीन देखील.१ त्याचा आदेश त्यांच्या दरम्यान अवतरित होतो, यासाठी की तुम्ही जाणून घ्यावे की अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे, आणि अल्लाहने प्रत्येक गोष्टीला आपल्या ज्ञानकक्षेत घेरलेले आहे.
____________________
(१) ‘ख़लक़ मिनल्‌ अर्ज़ी मिस्‌लहुन्न’ अर्थात सात आकाशांप्रमाणे अल्लाहने सात जमिनीही निर्माण केल्या आहेत. काहींनी यास अभिप्रेत सात महाद्वीप घेतले आहे, परंतु हे उचित नाही. ज्याप्रमाणे एकावर एक सात आकाश आहेत, तद्‌वतच सात जमिनीही आहेत. ज्यांच्या दरम्यान फरक व अंतर आहे आणि प्रत्येक जमिनीवर अल्लाहची सृष्टीनिर्मिती आबाद आहे. (अल्‌ कुर्तबी)


الصفحة التالية
Icon