६. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही स्वतः आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना त्या आगीपासून वाचवा,१ जिचे इंधन मानव आणि दगड आहेत, जिच्यावर कठोर हृदयाचे सक्त फरिश्ते तैनात आहेत. ज्यांना अल्लाह जो आदेश देतो, त्याची ते अवज्ञा करीत नाहीत, किंबहुना जो काही आदेश दिला जातो त्याचे पालन करतात.
____________________
(१) यात ईमान राखणाऱ्यांना त्याच्या एका फार मोठ्या जबाबदारीची जाणीव दिली गेली आहे आणि ती ही की आपल्यासह आपल्या कुटुंबियांचा सुधार आणि त्यांच्या इस्लामी शिक्षणाची व्यवस्था करावी, यासाठी की या सर्वांनी जहन्नमचे इंधन होण्यापासून वाचावे. यास्तव पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले की जेव्हा मूल सात वर्षांचे होईल त्याला नमाज पढण्याचा आदेश द्या, दहा वर्षांचा झाल्यावर नमाजबाबत सुस्ती करताना पाहाल तर त्यांना मार द्या. (अबू दाऊद, तिर्मिजी किताबुल सलात) धर्मज्ञानी लोकांनी सांगितले आहे की याच प्रकारे त्यांना रोजे (व्रत) राखण्यासही प्रवृत्त करावे आणि इतर धार्मिक आदेशांचे पालन करण्याची ताकीद द्यावी यासाठी की जेव्हा ते सूज्ञतेच्या वयास पोहचतील तेव्हा त्यांच्यात धार्मिक सूज्ञताही भिनलेली असेल. (इब्ने कसीर)