८. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही अल्लाहपुढे (खरी आणि) निखालस माफी मागा. संभवतः तुमच्या पालनकर्त्याने तुमची दुष्कर्मे मिटवावित. आणि तुम्हाला अशा जन्नतमध्ये दाखल करावे जिच्या खाली प्रवाह वाहत आहेत. ज्या दिवशी अल्लाह पैगंबराला आणि ईमान राखणाऱ्यांना, जे त्यांच्यासोबत आहेत अपमानित करणार नाही. त्यांचे दिव्य तेज (नूर) त्यांच्या पुढे आणि त्यांच्या उजवीकडे धावत असेल. हे दुआ (प्रार्थना) करत असतील की हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला संपूर्ण तेज (नूर) प्रदान कर आणि आम्हाला क्षमा कर. निःसंशय, तू प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगणारा आहे.