ﯹ
                    surah.translation
            .
            
    
                                    من تأليف: 
                                            محمد شفيع أنصاري
                                                            .
                                                
            ﰡ
१. निश्चितच माणसावर काळाचा एक समय असाही आला आहे, जेव्हा तो काहीच उल्लेख करण्यायोग्य नव्हता.
                                                                        २. निःसंशय, आम्ही मानवाला मिश्र वीर्याद्वारे कसोटीकरिता निर्माण केले, आणि त्याला ऐकणारा पाहणारा बनविले.
                                                                        ३. आम्ही त्याला मार्ग दाखविला मग तो कृतज्ञ बनो किंवा कृतघ्न.
                                                                        ४. निःसंशय, आम्ही काफिर (इन्कारी) लोकांकरिता शृंखला आणि जोखंड व धगधगणारी आग तयार करून ठेवली आहे.
                                                                        ५. निःसंशय, नेक (सदाचारी) लोक त्या प्याल्याने पितील, ज्यात कापूराचे मिश्रण आहे.
                                                                        ६. जो एक झरा आहे, ज्यातून अल्लाहचे दास पितील, त्याचे प्रवाह (पाट) काढतील (जिकडे इच्छितील)
                                                                        ७. जे नवस पूर्ण करतात१ आणि त्या दिवसाचे भय बाळगतात, ज्याचे संकट चारी बाजूंना पसरणार आहे.
____________________
(१) अर्थात केवळ एक अल्लाहची उपासना करतात, नवसही मानतात तर फक्त अल्लाहकरिता आणि तो पूर्णही करतात. तात्पर्य, नवस पूर्ण करणे आवश्यक आहे, या अटीवर की तो अवज्ञेचा नसावा. हदीसमधील उल्लेखानुसार ज्याने नवस मानला असेल की तो अल्लाहचे आज्ञापालन करील तर त्याचे पालन करावे आणि ज्याने अल्लाहच्या अवज्ञेचा नवस मानला असेल तर त्याने असा नवस पूर्ण करू नये. (सहीह बुखारी, किताबुल ऐमान, बाबुन नज्रे फित ताअते)
                                                                        ____________________
(१) अर्थात केवळ एक अल्लाहची उपासना करतात, नवसही मानतात तर फक्त अल्लाहकरिता आणि तो पूर्णही करतात. तात्पर्य, नवस पूर्ण करणे आवश्यक आहे, या अटीवर की तो अवज्ञेचा नसावा. हदीसमधील उल्लेखानुसार ज्याने नवस मानला असेल की तो अल्लाहचे आज्ञापालन करील तर त्याचे पालन करावे आणि ज्याने अल्लाहच्या अवज्ञेचा नवस मानला असेल तर त्याने असा नवस पूर्ण करू नये. (सहीह बुखारी, किताबुल ऐमान, बाबुन नज्रे फित ताअते)
८. आणि अल्लाहच्या प्रेमाखातर गरीब, अनाथ आणि कैद्यांना जेवू घालतात.
                                                                        ९. आम्ही तर तुम्हाला केवळ अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी जेवू घालतो, तुमच्याकडून ना मोबदला इच्छितो, ना आभार.
                                                                        १०. निःसंशय, आम्ही आपल्या पालनकर्त्यातर्फे त्या दिवसाचे भय राखतो जो मोठा दुःस्थितीचा आणि कठोरतापूर्ण असेल.
                                                                        ११. तेव्हा अल्लाहने त्यांना त्या दिवसाच्या संकटापासून वाचविले. आणि त्यांना तजेलता व आनंद प्रदान केला.
                                                                        १२. आणि त्यांना त्यांच्या धीर - संयमाच्या मोबदल्यात जन्नत आणि रेशमी वस्त्र प्रदान केले.
                                                                        १३. ते तिथे आसनांवर तक्के लावून बसतील, त्यांना तिथे ना सूर्याची प्रखर उष्णता जाणवेल, ना सक्त थंडीची तीव्रता.
                                                                        १४. आणि त्यांच्या (जन्नतच्या) सावल्या त्यांच्यावर झुकलेल्या असतील आणि त्यांचे (मेवे) आणि गुच्छे खाली लोंबकळत असतील.
                                                                        १५. आणि त्यांच्या दरम्यान चांदीची भांडी आणि काचेचे प्याले ये - जा करतील.
                                                                        १६. काचही चांदीची असेल, ज्यांना (पिणाऱ्यांनी) अनुमानाने मापून ठेवले असेल.
                                                                        १७. आणि त्यांना तिथे अशी पेये पाजली जातील, ज्यात सुंठीचे मिश्रण असेल.
                                                                        १८. जन्नतच्या एका प्रवाहातून ज्याचे नाव सलसबील आहे.
                                                                        १९. आणि त्यांच्या चोहीकडे ती अल्पवयीन बालके हिंडत-फिरत असतील. जे नेहमी (बालक) राहणारे आहेत. जेव्हा तुम्ही त्यांना पाहाल तर कल्पना कराल की ते (जणू) विखुरलेले (अस्सल) मोती आहेत.
                                                                        २०. आणि तुम्ही तिथे, जिकडे पाहाल तिकडे पूर्ण ईशदेणग्या आणि महान राज्यसत्ता दिसून येईल.
                                                                        २१. त्यांच्या (शरीरा) वर हिरवे मौल्यवान आणि जाड रेशमी वस्त्रे असतील. आणि त्यांना चांदीच्या कांकणाचा दागिना घातला जाईल आणि त्यांना त्यांचा पालनकर्ता स्वच्छ शुद्ध (पाक) मद्य पाजेल.
                                                                        २२. (फर्माविले जाईल) हा आहे तुमच्या कर्मांचा मोबदला आणि तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा केली गेली.
                                                                        २३. निःसंशय, आम्ही तुमच्यावर कुरआन हळू हळू (क्रमाक्रमाने) अवतरित केले.
                                                                        २४. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आदेशावर अटळ राहा, आणि त्यांच्यापैकी कोणत्याही अपराध्याचे किंवा कृतघ्नाचे म्हणणे मान्य करू नका.
                                                                        २५. आणि सकाळ संध्याकाळ आपल्या पालनकर्त्याचे नामःस्मरण करा.
                                                                        २६. आणि रात्रीच्या वेळी त्याच्या समोर सजदे करा आणि रात्रीच्या दीर्घ भागापर्यर्ंत त्याचे पावित्र्यासह गुणगान करा.
                                                                        २७. निःसंशय, हे लोक लवकर प्राप्त होणाऱ्या जगाची इच्छा धरतात, आणि आपल्या मागे एक मोठ्या भारदस्त दिवसाला सोडून देतात.
                                                                        २८. आम्ही त्यांना निर्माण केले आणि आम्हीच त्यांचे जोड (सांधे) मजबूत केले आणि आम्ही वाटेल तेव्हा त्यांच्या बदल्यात त्यांच्यासारखे दुसऱ्यांना बदलून आणू.
                                                                        २९. निःसंशय, हा तर एक उपदेश आहे. तेव्हा जो इच्छिल त्याने आपल्या पालनकर्त्याचा मार्ग प्राप्त करावा.
                                                                        ३०. आणि तुम्ही इच्छा न कराल परंतु हे की अल्लाहच इच्छिल. निःसंशय, अल्लाह जाणणारा आणि हिकमत बाळगणारा आहे.
                                                                        ३१. ज्याला इच्छिल, आपल्या कृपेत सामील करून घेईल आणि अपराधी (अत्याचारीं) करिता त्याने दुःखदायक अज़ाब तयार करून ठेवला आहे.