ﰕ
surah.translation
.
من تأليف:
محمد شفيع أنصاري
.
ﰡ
१. मोठी वाईट अवस्था आहे अशा त्या प्रत्येक माणसाची जो व्यंग दोष शोधणारा, चहाडी करणारा असेल.
२. जो धन - दौलत एकत्र करतो आणि मोजून ठेवतो.
३. तो असे समजतो की त्याची धन - दौलत त्यांच्याजवळ सदा सर्वकाळ राहील.
४. मुळीच नाही. हा तर चुराडा करून टाकणाऱ्या आगीत फेकला जाईल.
५. आणि तुम्हाला काय माहीत की अशी आग काय असेल?
६. ती अल्लाहने पेटविलेली आग असेल.
७. जी हृदयांवर चढतच जाईल.
८. (ती आग) सगळीकडून बंदिस्त असेल.
९. आणि त्यांच्यावर मोठमोठ्या खांबांमध्ये.