سورة الدخان

الترجمة الماراتية

ترجمة معاني سورة الدّخان باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية

محمد شفيع أنصاري

الترجمة الماراتية

محمد شفيع أنصاري

الناشر

مؤسسة البر - مومباي

آية رقم 1
१. हा. मीम.
آية رقم 2
२. शपथ आहे या स्पष्ट ग्रंथाची.
३. निःसंशय, आम्ही या ग्रंथाला एका शुभरात्रीत१ अवतरित केले आहे. निःसंशय, आम्ही अवगत करून देणारे आहोत.
(१) शुभरात्रीशी अभिप्रेत ‘लैलतुल कद्र’ आहे. जसे की अन्य ठिकाणी सांगितले गेले आहे ‘‘अन्ना अल्जल्ना फी लैलतुल कद्र’’ (सूरह कद्र) ‘‘आम्ही हा कुरआन कद्रच्या रत्रीत अवतरित केला.’’ ही मुबारक (शुभ) रात्र रमजान महिन्याच्या अंतिम दहा रात्रींच्या विषम तारखेच्या रात्रींपैकी एक रात्र असते. इथे कद्र (सन्मान) च्या या रात्रीला शुभरात्र म्हटले गेले आहे. हिचे शुभ असण्यात काय शंका असू शकते. एक तर या रात्रीत कुरआनाचे अवतरण झाले. दुसरे हे की या रात्री फरिश्ते आणि जिब्रील अवतरित होतात. तिसरे असे की या रात्री संपूर्ण वर्षात घडणाऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टींचा फैसला केला जातो (जसे पुढे येत आहे). चौथे हे की या रात्रीची उपासना हजार महिन्यां (अर्थात ८३ वर्षे ३ महिने) च्या उपासनेपेक्षा उत्तम आहे. ‘शबे कद्र’ किंवा ‘लैल-ए-मुबारकह’मध्ये कुरआन अवतरित होण्याचा अर्थ हा की या रात्रीत पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर पवित्र कुरआनचे अवतरण सुरू झाले होते. किंवा यास अभिप्रेत ‘लौहे महफूज’ (सुरक्षित पट्टिका) मधून याच रात्री ‘बैतुल इज्जत’ (सन्मानगृह) मध्ये अवतरित केला गेला, जे जगाच्या आकाशात आहे. मग तेथून गरजेनुसार २३ वर्षांपावेतो विभिन्न काळांत पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर अवतरित होत राहिला. काहींनी ‘लैल-ए-मुबारकह’ (शुभरात्र) शी अभिप्रेत शाबान महिन्याची पंधरावी रात्र घेतली आहे. परंतु हे उचित नाही. जेव्हा कुरआनाच्या स्पष्ट शब्दांत ‘शबे कद्र’मध्ये अवतरित होणे सिद्ध आहे तेव्हा यापासून ‘शबे बराअत’ अभिप्रेत घेणे कदापि योग्य नव्हे. याखेरीज ‘शबे बराअत’ (शाबान महिन्याची पंधरावी रात्र)विषयी जेवढी कथने आहेत, ज्यात तिची श्रेष्ठता व महत्ता सांगितले गेली आहे किंवा त्यात तिला फैसल्याची रात्र म्हटले गेले आहे, ती सर्व निवेदने प्रमाणाच्या आधारास कमकुवत आहेत. अशी कथने कुरआनाच्या स्पष्ट शब्दांचा सामना कशा प्रकारे करू शकतात?
آية رقم 4
४. त्याच रात्रीत प्रत्येक महत्त्वपूर्ण कार्याचा निर्णय घेतला जातो.
آية رقم 5
५. आमच्याकडून एक फर्मान बनून आम्हीच आहोत रसूल (संदेशवाहक) बनवून पाठविणारे.
آية رقم 6
६. तुमच्या पालनकर्त्याच्या कृपेने, तोच आहे ऐकणारा आणि जाणणारा.
७. जो आकाशांचा आणि धरतीचा आणि त्यांच्या दरम्यान जे काही आहे त्या सर्वांचा स्वामी आहे, जर तुम्ही विश्वास राखणारे असाल.
८. त्याच्याशिवाय दुसरा कोणीही उपासना करण्यास पात्र नाही. तोच जिवंत करतो आणि मारतो. तोच तुमचा आणि तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या पूर्वजांचा स्वामी व पालनकर्ता आहे.
آية رقم 9
९. किंबहुना ते संशयात पडून खेळत आहेत.
آية رقم 10
१०. तुम्ही त्या दिवसाच्या प्रतीक्षेत राहा, जेव्हा आकाश उघड स्वरूपाचा धूर आणील.
آية رقم 11
११. जो लोकांना घेरा टाकील. ही मोठी दुःखदायक शिक्षा - यातना आहे.
آية رقم 12
१२. (म्हणतील की) हे आमच्या पालनकर्त्या! हा अज़ाब (शिक्षा - यातना) आमच्यापासून दूर कर, आम्ही ईमान स्वीकारले.
آية رقم 13
१३. त्यांच्यासाठी आता उपदेश कोठे आहे? स्पष्टरित्या निवेदन करणारे पैगंबर त्यांच्याजवळ (केव्हाच) येऊन गेलेत.
آية رقم 14
१४. तरीही त्यांनी त्यांच्याकडून तोंड फिरविले आणि सांगितले की हा तर शिकविलेला वेडा आहे.
آية رقم 15
१५. आम्ही शिक्षा - यातनेला थोडेसे दूरही करू तरी तुम्ही परत पुन्हा आपल्या त्याच अवस्थेत याल.
آية رقم 16
१६. ज्या दिवशी आम्ही मोठ्या सक्त पकडीत धरू, निश्चितच आम्ही प्रतिशोध (सूड) घेणार आहोत.
१७. आणि निःसंशय, आम्ही यापूर्वी फिरऔनच्या जनसमूहाची (ही) परीक्षा घेतली आहे ज्यांच्याजवळ (अल्लाहचा) प्रतिष्ठासंपन्न रसूल (पैगंबर) आला.
१८. की अल्लाहच्या दासांना माझ्या हवाली करा, विश्वास राखा की मी तुमच्यासाठी विश्वस्त पैगंबर आहे.
१९. आणि तुम्ही अल्लाहसमोर विद्रोह दाखवू नका. मी तुमच्यासमोर उघड पुरावा प्रस्तुत करेन.
آية رقم 20
२०. आणि मी, आपल्या व तुमच्या पालनकर्त्याच्या शरणात येतो. या गोष्टीपासून की तुम्ही मला दगडांनी ठेचून मारावे.
آية رقم 21
२१. आणि जर तुम्ही माझ्यावर ईमान राखत नसाल तर माझ्यापासून अलग राहा.
آية رقم 22
२२. मग त्यांनी आपल्या पालनकर्त्याला दुआ-प्रार्थना केली की हे सर्व अपराधी लोक आहेत.
آية رقم 23
२३. (आम्ही फर्माविले) की रात्रीतूनच तुम्ही माझ्या दासांना घेऊन निघा. निश्चितच तुमचा पाठलाग केला जाईल.
آية رقم 24
२४. आणि तुम्ही समुद्राला स्थिर अवस्थेत सोडून निघून जा. निःसंशय, हे सैन्य बुडविले जाईल.
آية رقم 25
२५. ते अनेक बागा आणि झरे सोडून गेले.
آية رقم 26
२६. आणि शेते व उत्तम निवासस्थाने.
آية رقم 27
२७. आणि त्या सुखदायक वस्तू ज्यांच्यात ते सुख भोगत होते.
آية رقم 28
२८. अशा प्रकारे घडले, आणि आम्ही त्या सर्वांचा उत्तराधिकारी (वारस) दुसऱ्या जनसमूहाला बनविले.
آية رقم 29
२९. तेव्हा त्यांच्यासाठी ना आकाश रडले ना धरती आणि ना त्यांना कसली संधी लाभली.
آية رقم 30
३०. आणि आम्हीच इस्राईलच्या संततीला (अतिशय) अपमानदायक शिक्षा-यातनेपासून मुक्ती दिली.
آية رقم 31
३१. (जी) फिरऔनतर्फे (दिली जात) होती. वास्तविक तो विद्रोही आणि मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांपैकी होता.
آية رقم 32
३२. आणि आम्ही जाणूनबुजून इस्राईलच्या संततीला जगातील लोकांवर श्रेष्ठता प्रदान केली.
آية رقم 33
३३. आणि आम्ही त्यांना अशा निशाण्या प्रदान केल्या, ज्यांच्यात उघड कसोटी होती.
آية رقم 34
३४. हे लोक तर हेच म्हणतात.
آية رقم 35
३५. की (अंतिम गोष्ट) हेच आमचे पहिल्यांदा (जगात) मरण पावणे आहे आणि आम्ही दुसऱ्यांदा उठविलो जाणार नाहीत.
آية رقم 36
३६. जर तुम्ही सच्चे असाल तर आमच्या पूर्वजांना घेऊन या.
३७. काय हे लोक अधिक चांगले आहेत की तुब्बअ च्या जनसमूहाचे लोक आणि जे त्यांच्याही पूर्वीचे होते? आम्ही त्या सर्वांना नष्ट करून टाकले. निःसंशय, ते अपराधी होते.
آية رقم 38
३८. आणि आम्ही आकाशांना व धरतीला आणि त्यांच्या दरम्यानच्या वस्तूंना खेळ स्वरूपात निर्माण केले नाही.
آية رقم 39
३९. किंबहुना आम्ही त्यांना उचित हेतुसहच निर्माण केले आहे. परंतु अधिकांश लोक हे जाणत नाहीत.
آية رقم 40
४०. निःसंशय, निर्णयाचा दिवस त्या सर्वांसाठी निर्धारित वेळी आहे.
४१. त्या दिवशी कोणी मित्र कोणा मित्राच्या काहीच कामी येणार नाही आणि ना त्यांची मदत केली जाईल.
آية رقم 42
४२. परंतु (त्याच्याखेरीज) ज्याच्यावर अल्लाहची दया - कृपा व्हावी. निःसंशय, तो मोठा शक्तिशाली आणि दया करणारा आहे.
آية رقم 43
४३. निःसंशय, जक्कूमचे झाड
آية رقم 44
४४. गुन्हेगारांचे भोजन आहे
آية رقم 45
४५. जे वितळलेल्या तांब्यासारखे आहे आणि पोटात उकळत राहते.
آية رقم 46
४६. खूप गरम उकळत्या पाण्यासारखे.
آية رقم 47
४७. त्याला धरा, मग फरफटत ओढत नेऊन जहन्नमच्या मध्यभागी पोहचवा,
آية رقم 48
४८. मग त्याच्या डोक्यावर गरम उकळत्या पाण्याची यातना (अज़ाब) ओता.
آية رقم 49
४९. (त्याला सांगितले जाईल) चाखत जा (गोडी), तू तर मोठा प्रतिष्ठित आणि आदरसन्मान बाळगणारा होता.
آية رقم 50
५०. हीच ती गोष्ट होय, जिच्याबाबत तुम्ही शंका करीत असत.
آية رقم 51
५१. निःसंशय, अल्लाहचे भय बाळगणारे शांतीपूर्ण ठिकाणी असतील
آية رقم 52
५२. बागांमध्ये आणि जलस्रोतां (झऱ्यां) मध्ये.
آية رقم 53
५३. पातळ व मुलायम रेशमी वस्त्रे घातलेले, समोरासमोर बसले असतील.
آية رقم 54
५४. हे त्याच प्रकारे आहे, आणि आम्ही मोठया नेत्रांच्या हूर-परींशी त्यांचा विवाह करून देऊ.
آية رقم 55
५५. निर्भयतापूर्वक तिथे प्रत्येक प्रकारच्या मेव्याची मागणी करतील.
५६. तिथे ते मृत्युचा स्वाद चाखणार नाहीत, पहिल्या मृत्युखेरीज (जो जगात घडला) त्यांना अल्लाहने जहन्नमच्या (भयंकर) शिक्षा - यातने (अज़ाब) पासून वाचविले.
آية رقم 57
५७. ही केवळ तुमच्या पालनकर्त्याची कृपा आहे. हीच आहे मोठी सफलता.
آية رقم 58
५८. आम्ही या (कुरआना) ला तुमच्या भाषेत सोपे केले, यासाठी की त्यांनी (लोकांनी) बोध ग्रहण करावा.
آية رقم 59
५९. आता तुम्ही प्रतीक्षा करा, हे देखील प्रतीक्षा करीत आहेत.
تقدم القراءة