سورة النازعات

الترجمة الماراتية

ترجمة معاني سورة النازعات باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية

محمد شفيع أنصاري

الترجمة الماراتية

محمد شفيع أنصاري

الناشر

مؤسسة البر - مومباي

آية رقم 1
१. बुडून कठोरतापूर्वक खेचणाऱ्यांची शपथ.१
(१) हे प्राण काढणाऱ्या फरिश्त्या ंचे वर्णन आहे. फरिश्ते काफिरांचे प्राण मोठ्या कठोरपणे काढतात आणि तेही शरीरात बुडून.
آية رقم 2
२. बंधन उकलून सोडविणाऱ्यांची शपथ.
آية رقم 3
३. आणि पोहणाऱ्या फिरणाऱ्यांची शपथ. १
(१) फरिश्त्ये प्राण काढण्यासाठी माणसाच्या शरीरात असे पोहत फिरतात, जणू पाण्यात तळाशी जाणारा पाणबुड्या मोती काढण्यासाठी समुद्रात अगदी खोलवर पोहत फिरतो किंवा असा अर्थ की अतिशय वेगाने फरिश्ते अल्लाहचा आदेश घेऊन आकाशातून उतरतात कारण वेगवान घोड्यालाही ‘सबिअ’ म्हणतात.
آية رقم 4
४. मग धावत पुढे जाणाऱ्यांची शपथ!
آية رقم 5
५. मग कार्याची योजना करणाऱ्यांची शपथ!
آية رقم 6
६. ज्या दिवशी थरथर कांपणारी थरथर कांपेल,
آية رقم 7
७. त्यानंतर एक मागे येणारी (मागोमाग) येईल.
آية رقم 8
८. (अनेक) हृदय त्या दिवशी धडधड करतील.
آية رقم 9
९. ज्यांच्या नजरा खाली असतील.
آية رقم 10
१०. असे म्हणतात की, काय आम्हाला पहिल्यासारख्या अवस्थेकडे पुन्हा परतविले जाईल?
آية رقم 11
११. काय अशा वेळी की जेव्हा आम्ही अगदी जीर्णशीर्ण हाडे होऊन जाऊ?
آية رقم 12
१२. म्हणतात की मग तर हे परतणे नुकसानदायक आहे. (माहीत असले पाहिजे)
آية رقم 13
१३. की ती तर केवळ एक (भयानक) दरडावणी आहे.
آية رقم 14
१४. (जी दिली जाताच) ते एकदम मैदानात जमा होतील.
آية رقم 15
१५. काय, मूसा (अलैहिस्सलाम) चा वृत्तांत तुम्हास पोहचला आहे?
آية رقم 16
१६. जेव्हा त्यांना त्यांच्या पालनकर्त्याने तूवाच्या पवित्र मैदानात पुकारले.
آية رقم 17
१७. (की) तुम्ही फिरऔनजवळ जा, त्याने बंडखोरी (उदंडता) अंगीकारली आहे.
آية رقم 18
१८. त्याला सांगा की, काय तू स्वतःची दुरुस्ती आणि सुधारणा इच्छितो.
آية رقم 19
१९. आणि हे की मी तुला तुझ्या पालनकर्त्याचा मार्ग दाखवू यासाठी की तू (त्याचे) भय बाळगू लागावे.
آية رقم 20
२०. तेव्हा त्याला मोठी निशाणी दाखविली.
آية رقم 21
२१. तर त्याने खोटे ठरविले आणि अवज्ञा केली.
آية رقم 22
२२. मग पुन्हा परतला प्रयत्न करीत१
(१) अर्थात त्याने ईमान आणि आदेशाचा केवळ इन्कारच केला नाही तर धरतीत उत्पात माजविण्याचा आणि हजरत मूसाशी सामना (विरोध) करण्याचा प्रयत्न करीत राहिला आणि जादूगारांना एकत्र करून मूसा (अलै.) यांच्याशी सामना करविला यासाठी की त्यांना खोटे ठरविले जाऊ शकावे.
آية رقم 23
२३. मग सर्वांना एकत्र करून उंच स्वरात ऐलान केले.
آية رقم 24
२४. म्हणाला, तुम्हा सर्वांचा पालनहार मीच आहे.
آية رقم 25
२५. तेव्हा (सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ) अल्लाहने देखील त्याला आखिरत (मरणोत्तर जीवना) च्या आणि या जगाच्या शिक्षा - यातनेत घेरले.
آية رقم 26
२६. निःसंशय, यात त्या माणसाकरिता बोध आहे, जो भय राखील.
آية رقم 27
२७. काय तुम्हाला निर्माण करणे अधिक कठीण आहे किंवा आकाशाला? सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्याला निर्माण केले.
آية رقم 28
२८. त्याची उंची वाढविली, मग त्याला यथायोग्य केले.
آية رقم 29
२९. आणि त्याच्या रात्रीला अंधकारपूर्ण बनविले आणि त्याच्या दिवसाला प्रकट केले.
آية رقم 30
३०. आणि त्यानंतर जमिनीला (समतल) बिछविले.
آية رقم 31
३१. त्यातून पाणी आणि चारा काढला.
آية رقم 32
३२. आणि पर्वतांना (मजबूत) रोवले.
آية رقم 33
३३. हे सर्व तुमच्या आणि तुमच्या जनावरांच्या फायद्यासाठी (आहे).
آية رقم 34
३४. तर जेव्हा ते मोठे संकट (कयामत) येईल.
آية رقم 35
३५. ज्या दिवशी मनुष्य आपल्या केलेल्या कर्मांची आठवण करील.
آية رقم 36
३६. आणि (प्रत्येक) पाहणाऱ्याच्या समोर जहन्नम उघडपणे आणली जाईल.
آية رقم 37
३७. तेव्हा, ज्या (माणसा) ने विद्रोह अंगीकारला (असेल).
آية رقم 38
३८. आणि ऐहिक जीवनाला प्राधान्य दिले (असेल).
آية رقم 39
३९. (त्याचे) ठिकाण जहन्नमच आहे.
४०. तथापि, जो मनुष्य आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्यापासून भीत राहिला असेल आणि आपल्या मनाला इच्छा-अभिलाषांपासून रोखले असेल.
آية رقم 41
४१. तर त्याचे ठिकाण जन्नतच आहे.
آية رقم 42
४२. लोक तुम्हाला कयामत केव्हा घडून येईल असे विचारतात.
آية رقم 43
४३. ते सांगण्याशी तुमचा काय संबंध?
آية رقم 44
४४. तिच्या ज्ञानाची अंतिम सीमा तर अल्लाहकडे आहे.
آية رقم 45
४५. तुम्ही तर फक्त तिच्याशी भयभीत राहणाऱ्यांना सावधान करणारे आहात.१
(१) अर्थात तुमचे काम केवळ ‘इन्ज़ार’ (भय दाखविणे) आहे, परोक्ष (गैब) च्या वार्ता देणे नव्हे, ज्यात कयामतचे ज्ञान आहे जे अल्लाहने कोणालाही दिले नाही. ‘मनयख्‌शाहा’ अशासाठी म्हटले आहे की तंबी (चेतावणी) आणि धर्म-प्रचाराचा खरा लाभ त्यालाच मिळतो, ज्याच्या मनात अल्लाहचे भय असते, अन्यथा खबरदार करण्याचा आणि संदेश पोहचविण्याचा आदेश तर प्रत्येक माणसाकरिता आहे.
४६. ज्या दिवशी हे तिला (प्रत्यक्ष) पाहून घेतील तेव्हा असे वाटेल की केवळ दिवसाचा अंतिम भाग अथवा आरंभीचा भागच ते (या जगात) राहिलेत.
تقدم القراءة