ﯞ
surah.translation
.
من تأليف:
محمد شفيع أنصاري
.
ﰡ
१. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या पुढे जाऊ नका१ आणि अल्लाहचे भय बाळगत राहा. निःसंशय अल्लाह ऐकणारा, जाणणारा आहे.
____________________
(१) अर्थात धर्माच्या संदर्भात स्वतःच एखादा निर्णय घेत जाऊ नका, ना स्वतःच्या आकलन व विचाराला प्राधान्य द्या, किंबहुना अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आदेशआचे पालन करा. आपल्यातर्फे धर्मात वाढकिंवा बिदआत (नव्या गोष्टी) जारी करणे, अल्लाह आणि पैगंबराच्या पुढे जाण्याचे दुःसाहस करणे होय. जे कोणत्याही ईमानधारकासाठी योग्य नव्हे. त्याचप्रमाणे एखादा फतवा कुरआन व हदीसमध्ये विचार न करता दिला जावा आणि दिल्यानंतर जर तो शरिअतविरूद्ध दिल्याचे स्पष्ट व्हावे, तर त्यावर अडून राहणे देखील, या आयतीत दिल्या गेलेल्या अनुमतीच्या विरूद्ध आहे. ईमान राखणाऱ्याचे आचरण तर अल्लाह आणि पैगंबराच्या आदेशापुढे समर्पण आणि पालन करण्यासाठी नतमस्तक होणे होय. त्याच्या विरोधात आपले स्वतःचे कथन किंवा एखाद्या इमामाच्या विचारावर अडून राहणे नव्हे.

२. हे ईमान राखणाऱ्यांनो! आपला स्वर (आवाज) पैगंबराच्या स्वरापेक्षा उंचावू नका, आणि त्यांच्याशी अशा प्रकारे उंच स्वरात बोलू नका ज्या प्रकारे आपसात एकमेकांशी बोलता. (कदाचित असे न व्हावे) की तुमची कर्मे वाया जावीत आणि तुम्हाला खबरही न व्हावी.१
____________________
(१) यात पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) करिता आदर सन्मान राखण्याचे वर्णन आहे, जे प्रत्येक मुसलमानाकडून अपेक्षित आहे.
____________________
(१) यात पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) करिता आदर सन्मान राखण्याचे वर्णन आहे, जे प्रत्येक मुसलमानाकडून अपेक्षित आहे.
३. वस्तुतः जे लोक पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या समोर आपला स्वर धीमा (खालचा) राखतात, हेच ते लोक होत, ज्यांच्या हृदयांना, अल्लाहने तकवा (अल्लाहच्या भया) करीता पारखून घेतले आहे, त्यांच्यासाठी माफी आहे आणि फार मोठे पुण्य आहे.
४. निःसंशय, जे लोक तुम्हाला खोल्यांच्या मागून हाक मारतात, त्यांच्यापैकी अधिकांश (पूर्णतः) निर्बुद्ध आहेत.
५. आणि जर या लोकांनी येथेपर्यंत धीर संयम राखला असता की तुम्ही (स्वतः) त्यांच्या जवळ आले असते तर हेच त्यांच्यासाठी अधिक चांगले झाले असते, आणि अल्लाह माफ करणारा, दया करणारा आहे.
६. हे ईमान राखणाऱ्यांनो! जर तुम्हाला एखादा दुराचारी खबर देईल तर तुम्ही त्याची चांगल्या प्रकारे चौकशी करून घेत जा (असे न व्हावे) की अजाणतेपणामुळे तुम्ही एखाद्या समुदायाला हानी पोहचवावी, मग नंतर आपल्या कृत्यावर पश्चात्ताप करू लागावे.
७. आणि जाणून असा की तुमच्या दरम्यान अल्लाहचा पैगंबर हजर आहे जर बहुतेक गोष्टींमध्ये ते तुमचे म्हणणे मानत राहिले तर तुम्ही अडचणीत पडाल, परंतु अल्लाहने तुमच्यासाठी ईमानास प्रिय बनविले आणि त्यास तुमच्या हृदयात सुशोभित केले आहे आणि कुप्र (इन्कार) ला आणि दुष्कर्मांना व अवज्ञाकारितेला तुमच्या नजरेत अप्रिय बनवेले आहे. हेच लोक सन्मार्ग प्राप्त झालेले आहेत.
८. अल्लाहच्या कृपा आणि अनुग्रहाने, आणि अल्लाह जाणणारा व बुद्धिकौशल्य बाळगणारा आहे.
९. आणि जर मुसलमानांचे दोन गट आपसात लढू लागतील तर त्याच्यात समेट (मिलाफ) घडवून आणा, मग जर त्यांच्यापैकी एक गट दुसऱ्या गटावर अत्याचार करील, तर तुम्ही (सर्व) अत्याचार करणाऱ्या गटाशी लढा. येथे पर्यर्ंत की तो अल्लाहच्या आदेशाकडे परत यावा,१ जर परतून आला तर न्यायपूर्वक त्यांच्या दरम्यान समजोता करा आणि न्याय करा. निःसंशय, अल्लाह न्याय करणाऱ्यांशी प्रेम राखतो.
____________________
(१) अर्थात अल्लाह आणि पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या आदेशानुसार आपसातील मतभेद मिटविण्यास तयार नसतील आणि उत्पात (फसाद) माजविण्याची नीती अंगीकारतील तर अशा स्थितीत इतर मुसलमानांची ही जबाबदारी आहे की सर्वांनी मिळून उत्पात माजविणाऱ्यांशी लढा द्यावा, येथपावेतो की त्यांनी अल्लाहचा आदेश मानण्यास तयार व्हावे.

१०. (लक्षात ठेवा) समस्त ईमान राखणारे (आपसात) भाऊ भाऊ आहेत, तेव्हा आपल्या दोन बांधवांच्या दरम्यान समेट (मिलाफ) करून देत राहा आणि अल्लाहचे भय बाळगत राहा, यासाठी की तुमच्यावर दया कृपा केली जावी.
११. हे ईमान राखणाऱ्यांनो! पुरुषांनी दुसऱ्या पुरुषांची थट्टा उडवू नये, संभवतः ते यांच्याहून अधिक चांगले असावेत आणि ना स्त्रियांनी (इतर) स्त्रियांची थट्टा करावी. संभवतः त्या, त्यांच्याहून अधिक चांगल्या असाव्यात, आणि आपसात एकमेकांवर दोषारोप ठेवू नका आणि ना एखाद्याला वाईट टोपण नाव द्या. ईमानानंतर फिस्क (वाईट शब्द) वाईट नाव आहे। आणि जे क्षमा-याचना न करतील, तर तेच अत्याचारी लोक आहेत.
१२. हे ईमान राखणाऱ्यांनो! अनेक वाईट तर्क (दुराग्रह) करण्यापासून दूर राहा, विश्वास राखा की काही तर्क अपराध आहेत आणि भेद (जाणून घेण्यासाठी) पाळतीवर राहू नका आणि ना तुमच्यापैकी कोणी एखाद्याची निदा-नालस्ती (त्याच्या पश्चात) करावी. काय तुमच्यापैकी कोणीही आपल्या मेलेल्या भावाचे मांस खाणे पसंत करतो? तुम्हाला तर त्या गोष्टीचा तिरस्कारच वाटेल आणि अल्लाहचे भय बाळगत राहा. निःसंशय, अल्लाह माफी कबूल करणारा दयाशील आहे.
१३. लोकांनो! आम्ही तुम्हाला एकाच पुरुष आणि स्त्रीपासून निर्माण केले आहे आणि यासाठी की तुम्ही आपसात एकमेकांना ओळखावे, अनेक जाती आणि प्रजाती बनविल्या, अल्लाहच्या नजरेत तुम्हा सर्वांत प्रतिष्ठासंपन्न तो आहे, जो सर्वांत जास्त (अल्लाहचे) भय बाळगणारा आहे.१ निःसंशय, अल्लाह जाणणारा, चांगल्या प्रकारे जाणतो.
____________________
(१) अर्थात अल्लाहजवळ प्राधान्य किंवा श्रेष्ठतेचे स्तर परिवार, जात किंवा वंशावळीवर अवलंबून नाही. आणि हे कोणा माणसाच्या अधिकारकक्षेतही नाही. किंबहुना हे स्तर तकवा (अल्लाहचे भय राखून केलेले कर्म) आहे, जे अंगीकारणे माणसाच्या अवाक्यात आहे. होय आयत त्या धर्मज्ञानी लोकांचे प्रमाण आहे, जे विवाहसंदर्भात जात आणि वंशाच्या समनातेला आवश्यक जाणत नाहीत आणि केवळ दीन (धर्मा) च्या आधारावर विवाह करण्यास पसंत करतात. (इब्ने कसीर)

१४. ग्रामीण लोक म्हणतात की आम्ही ईमान राखले. (तुम्ही) सांगा की, तुम्ही ईमान राखले नाही, परंतु तुम्ही असे म्हणा की आम्ही इस्लामचा स्वीकार केला (विरोध सोडून आज्ञाधारक झालोत) वास्तविक अजूनपर्यंत ईमान तुमच्या हृदयात दाखल झालेच नाही. जर तुम्ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे आज्ञापालन करू लागाल तर अल्लाह तुमच्या कर्मांमधून काहीच घटविणार नाही. निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा दया करणारा आहे.
१५. ईमान राखणारे (खरे) तर ते आहेत, जे अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर (मजबूत) ईमान राखतील, मग शंका संशय न करतील आणि आपल्या धनाने आणि आपल्या प्राणाने अल्लाहच्या मार्गात जिहाद (धर्मयुद्ध) करीत राहतील (आपल्या ईमानाच्या दाव्यात) हेच सच्चे आहेत.
१६. सांगा की काय तुम्ही अल्लाहला आपल्या धार्मिकतेची जाणीव करून देत आहात? अल्लाह, ते सर्व काही जे आकाशांमध्ये आणि धरतीत आहे, चांगल्या प्रकारे जाणतो, आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट जाणणारा आहे.
१७. ते तुम्हाला आपल्या मुसलमान होण्याचा उपकार जाणिवतात. (तुम्ही) सांगा की आपल्या मुसलमान होण्याचा उपकार माझ्यावर ठेवू नका, किंबहुना अल्लाहचा तुमच्यावर उपकार आहे की त्याने तुम्हाला ईमानकडे मार्गदर्शन केले, जर तुम्ही सच्चे असाल.
१८. निःसंशय, आकाशांच्या आणि जमिनीच्या सर्व लपलेल्या गोष्टी अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो, आणि जे काही तुम्ही करीत आहात, ते अल्लाह चांगल्या प्रकारे पाहत आहे.