الترجمة الماراتية मधून الماراتية मध्ये सुरा الرحمن चा अनुवाद
Verse 1
ﭷ
ﭸ
१. दयावान (रहमान) ने.
Verse 2
ﭹﭺ
ﭻ
२. कुरआन शिकविले.
Verse 3
ﭼﭽ
ﭾ
३. त्यानेच मानवाला निर्माण केले.
Verse 4
ﭿﮀ
ﮁ
४. त्याला बोलणे शिकविले.
Verse 5
ﮂﮃﮄ
ﮅ
५. सूर्य आणि चंद्र (निर्धारित) हिशोबाचे पालन करतात.
Verse 6
ﮆﮇﮈ
ﮉ
६. आणि तारे व वृक्ष दोघे सजदा करतात.
Verse 7
ﮊﮋﮌﮍ
ﮎ
७. त्यानेच आकाशाला उंच केले आणि त्यानेच तुला (तराजू) राखली.
Verse 8
ﮏﮐﮑﮒ
ﮓ
८. यासाठी की तुम्ही तोलण्यात मर्यादेचे उल्लंघन न करावे.
Verse 9
ﮔﮕﮖﮗﮘﮙ
ﮚ
९. आणि न्यायासह तोल उचित राखा आणि तोलण्यात कमी देऊ नका.
Verse 10
ﮛﮜﮝ
ﮞ
१०. आणि त्यानेच सृष्टीकरिता जमिनीला बिछविले.
Verse 11
ﮟﮠﮡﮢﮣ
ﮤ
११. जिच्यात मेवे आहेत आणि गुच्छांच्या खजुरीचे वृक्ष आहेत.
Verse 12
ﮥﮦﮧﮨ
ﮩ
१२. आणि भूसेदार धान्य आहे आणि सुगंधित फुले आहेत.
Verse 13
ﮪﮫﮬﮭ
ﮮ
१३. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 14
ﮯﮰﮱﯓﯔ
ﯕ
१४. त्याने मानवाला खणखणणाऱ्या मातीपासून निर्माण केले, जी ठिकरीसारखी होती.
Verse 15
ﯖﯗﯘﯙﯚﯛ
ﯜ
१५. आणि जिन्नांना अग्निशिखेपासून निर्माण केले.
Verse 16
ﯝﯞﯟﯠ
ﯡ
१६. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 17
ﯢﯣﯤﯥ
ﯦ
१७. तो दोन्ही पूर्वांचा आणि दोन्ही पश्चिमांचा स्वामी आहे.
Verse 18
ﯧﯨﯩﯪ
ﯫ
१८. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 19
ﭑﭒﭓ
ﭔ
१९. त्याने दोन समुद्र प्रवाहित केले जे एकमेकास मिळतात.
Verse 20
ﭕﭖﭗﭘ
ﭙ
२०. त्या दोघांच्या दरम्यान एक आड (पडदा) आहे की त्यापुढे जाऊ शकत नाहीत.
Verse 21
ﭚﭛﭜﭝ
ﭞ
२१. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 22
ﭟﭠﭡﭢ
ﭣ
२२. त्या दोघांमधून मोती आणि प्रवाळ निघतात.
Verse 23
ﭤﭥﭦﭧ
ﭨ
२३. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 24
ﭩﭪﭫﭬﭭﭮ
ﭯ
२४. आणि अल्लाहच्याच (अधिकारकक्षेत) आहेत ती जहाजे, जी समुद्रात पर्वतांसारखी उंच (उभी) चालत आहेत.
Verse 25
ﭰﭱﭲﭳ
ﭴ
२५. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 26
ﭵﭶﭷﭸ
ﭹ
२६. जमिनीवर जे काही आहे ते सर्व नाश पावणारे आहे.
Verse 27
ﭺﭻﭼﭽﭾﭿ
ﮀ
२७. केवळ तुमच्या पालनकर्त्याचे मुख (अस्तित्व), जो मोठा महान आणि प्रतिष्ठा बाळगणारा आहे, बाकी राहील.
Verse 28
ﮁﮂﮃﮄ
ﮅ
२८. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 29
२९. आकाशांमध्ये व जमिनीवर जे जे आहेत सर्व त्याच्याचकडे याचना करतात, प्रत्येक दिवस तो एका कार्यात आहे.१
____________________
(१) प्रत्येक दिवसाशी अभिप्रेत क्षण. मूळ शब्द ‘शान’ याचा अर्थ काम आणि विषय अर्थात प्रत्येक क्षणी तो काही ना काही करत असतो. कोणाला रोगी बनवितो तर कोणाला स्वस्थ, कोणाला श्रीमंत बनवितो तर कोणा श्रीमंताला गरीब, कोणाला रंक (भिकारी) चा राजा तर कोणा राजाला रंक, कोणाला उच्च पदावर बसवितो तर कोणाला खालच्या पदावर आणतो, कोणाला शून्यातून निर्माण करतो तरक कोणाला अस्तित्वहीन करतो वगैरे. थोडक्यात सांगायचे तर विश्वात नित्य घडून येणारे सर्व स्थित्यंतर आणि परिवर्तन त्याच्या मर्जीने व आदेशाने होत आहे आणि रात्र व दिवसाचा असा एकही क्षण नाही जो त्याच्या या शान (वैभवा) विरहित असावा.
____________________
(१) प्रत्येक दिवसाशी अभिप्रेत क्षण. मूळ शब्द ‘शान’ याचा अर्थ काम आणि विषय अर्थात प्रत्येक क्षणी तो काही ना काही करत असतो. कोणाला रोगी बनवितो तर कोणाला स्वस्थ, कोणाला श्रीमंत बनवितो तर कोणा श्रीमंताला गरीब, कोणाला रंक (भिकारी) चा राजा तर कोणा राजाला रंक, कोणाला उच्च पदावर बसवितो तर कोणाला खालच्या पदावर आणतो, कोणाला शून्यातून निर्माण करतो तरक कोणाला अस्तित्वहीन करतो वगैरे. थोडक्यात सांगायचे तर विश्वात नित्य घडून येणारे सर्व स्थित्यंतर आणि परिवर्तन त्याच्या मर्जीने व आदेशाने होत आहे आणि रात्र व दिवसाचा असा एकही क्षण नाही जो त्याच्या या शान (वैभवा) विरहित असावा.
Verse 30
ﮒﮓﮔﮕ
ﮖ
३०. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 31
ﮗﮘﮙﮚ
ﮛ
३१. (हे जिन्न आणि मानवांच्या समूहांनो!) लवकरच आम्ही तुमच्याकडे पूर्णतः लक्ष केंद्रित करू.
Verse 32
ﮜﮝﮞﮟ
ﮠ
३२. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 33
३३. (हे जिन्न आणि मनावांच्या समूहांनो!) जर तुमच्यात आकाशांच्या आणि धरतीच्या किनाऱ्या (सीमा) बाहेर निघण्याचे सामर्थ्य आहे, तर निघून जा (तथापि) वर्चस्व आणि सामर्थ्याविना तुम्ही निघू शकत नाही.
Verse 34
ﯔﯕﯖﯗ
ﯘ
३४. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 35
३५. तुमच्यावर आगीचे निखारे आणि धूर सोडला जाईल, मग तुम्ही सामना करू शकणार नाहीत.
Verse 36
ﯢﯣﯤﯥ
ﯦ
३६. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 37
ﯧﯨﯩﯪﯫﯬ
ﯭ
३७. मग जेव्हा आकाश विदीर्ण होऊन लाल होईल, जणू लाल चामडे असावे.
Verse 38
ﯮﯯﯰﯱ
ﯲ
३८. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 39
३९. त्या दिवशी कोणत्याही मानवाला आणि कोणत्याही जिन्नाला त्याच्या अपराधांविषयी विचारणा केली जाणार नाही.
Verse 40
ﯼﯽﯾﯿ
ﰀ
४०. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 41
ﰁﰂﰃﰄﰅﰆ
ﰇ
४१. अपराधी लोक केवळ आपल्या चेहऱ्या-मोहऱ्यावरूनच ओळखले जातील आणि त्यांच्या कपाळाचे केस व पाय धरले जातील.
Verse 42
ﭑﭒﭓﭔ
ﭕ
४२. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 43
ﭖﭗﭘﭙﭚﭛ
ﭜ
४३. हीच ती जहन्नम आहे, जिला अपराधी खोटे मानत होते.
Verse 44
ﭝﭞﭟﭠﭡ
ﭢ
४४. तिच्या गरम उकळत्या पाण्याच्या दरम्यान फेर खातील.
Verse 45
ﭣﭤﭥﭦ
ﭧ
४५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 46
ﭨﭩﭪﭫﭬ
ﭭ
४६. आणि त्या माणसाकरिता, जो आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्यास घाबरला , दोन जन्नत आहेत.
Verse 47
ﭮﭯﭰﭱ
ﭲ
४७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 48
ﭳﭴ
ﭵ
४८. दोन्हीही जन्नती अनेक शाखा असलेल्या आहेत.
Verse 49
ﭶﭷﭸﭹ
ﭺ
४९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 50
ﭻﭼﭽ
ﭾ
५०. त्या दोन्ही जन्नतींमध्ये दोन वाहते झरे आहेत.
Verse 51
ﭿﮀﮁﮂ
ﮃ
५१. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 52
ﮄﮅﮆﮇﮈ
ﮉ
५२. त्या दोन्हीं (जन्नतीं) मध्ये प्रत्येक मेव्याचे दोन प्रकार असतील.
Verse 53
ﮊﮋﮌﮍ
ﮎ
५३. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 54
५४. जन्नतमध्ये राहणारे अशा बिछायतींवर तक्के लावून बसतील, ज्यांचे अस्तर जाड रेशमाचे असेल आणि त्या दोन्ही जन्नतींची फळे (मेवे) खूप जवळ असतील.
Verse 55
ﮚﮛﮜﮝ
ﮞ
५५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 56
५६. तिथे (लाजाळू) खाली नजर ठेवणाऱ्या हूर (पऱ्या) आहेत, ज्यांना त्यांच्यापूर्वी कोणत्याही जिन्न आणि मानवाने हात लावला नसेल.
Verse 57
ﮩﮪﮫﮬ
ﮭ
५७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 58
ﮮﮯﮰ
ﮱ
५८. त्या (हूर-पऱ्या) माणिक (याकूत) आणि प्रवाळासारख्या असतील.
Verse 59
ﯓﯔﯕﯖ
ﯗ
५९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 60
ﯘﯙﯚﯛﯜ
ﯝ
६०. भलेपणाचा मोबदला, भलेपणाशिवाय दुसरा काय आहे.
Verse 61
ﯞﯟﯠﯡ
ﯢ
६१. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 62
ﯣﯤﯥ
ﯦ
६२. आणि त्याच्याखेरीज दोन जन्नती आणखी आहेत.
Verse 63
ﯧﯨﯩﯪ
ﯫ
६३. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 64
ﯬ
ﯭ
६४. दोन्ही गाढहिरव्या रंगाच्या.
Verse 65
ﯮﯯﯰﯱ
ﯲ
६५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 66
ﯳﯴﯵ
ﯶ
६६. त्यांच्यात दोन (वेगाने) उचंबळणारे झरे आहेत.
Verse 67
ﯷﯸﯹﯺ
ﯻ
६७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 68
ﯼﯽﯾﯿ
ﰀ
६८. त्या दोघांमध्ये मेवे आणखी खजुरी व डाळींब असतील.
Verse 69
ﰁﰂﰃﰄ
ﰅ
६९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 70
ﭑﭒﭓ
ﭔ
७०. त्यांच्यात सत्शील चारित्र्यवान सुंदर स्त्रिया आहेत.
Verse 71
ﭕﭖﭗﭘ
ﭙ
७१. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 72
ﭚﭛﭜﭝ
ﭞ
७२. (गौरवर्णीय) हूर (पऱ्या) जन्नतच्या खेम्यांमध्ये राहणाऱ्या आहेत.
Verse 73
ﭟﭠﭡﭢ
ﭣ
७३. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 74
ﭤﭥﭦﭧﭨﭩ
ﭪ
७४. त्यां (हूर - पऱ्या) ना कोणत्याही मानव आणि जिन्नाने यापूर्वी हात लावला नाही (स्पर्शही केला नाही).
Verse 75
ﭫﭬﭭﭮ
ﭯ
७५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 76
ﭰﭱﭲﭳﭴﭵ
ﭶ
७६. हिरव्या गाद्या आणि सुंदर बिछान्यांवर तक्के लावून बसले असतील.
Verse 77
ﭷﭸﭹﭺ
ﭻ
७७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल?
Verse 78
ﭼﭽﭾﭿﮀﮁ
ﮂ
७८. मोठे शुभ (आणि समृद्धशाली) आहे तुमच्या पालनकर्त्याचे नाव, जो मोठा प्रतापशाली आणि मोठा
تقدم القراءة