ترجمة معاني سورة ق باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. क़ाफ. फार मोठी गरिमा राखणाऱ्या या कुरआनाची शपथ आहे.
२. तथापि त्यांना आश्चर्य वाटले की त्यांच्याजवळ त्यांच्यामधूनच एक खबरदार करणारा आला, तेव्हा काफिर म्हणाले, ही एक विचित्र गोष्ट आहे.
३. काय जेव्हा आम्ही मेल्यावर माती होऊन जाऊ, मग हे परतणे दूरची गोष्ट आहे.
४. जमीन जे काही त्यांच्यातून घटविते, ते आम्ही जाणतो आणि आमच्याजवळ सर्व स्मरणात राखणारा ग्रंथ आहे.
५. तथापि त्यांनी सत्य गोष्टीला खोटे म्हटले, जेव्हा ती त्यांच्याजवळ पोहचली, तेव्हा ते गोंधळात पडले आहेत.
६. काय त्यांनी आकाशाला आपल्यावर (असलेले) पाहिले नाही की आम्ही ते कशा प्रकारे बनविले आहे आणि त्याला सुशोभित केले आहे? त्यात कोठेही फट (किंवा छिद्र) नाही.
७. आणि जमिनीला आम्ही बिछविले आहे आणि तिच्यावर आम्ही पर्वत रोवले आणि तिच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर वस्तू उगविल्या.
८. यासाठी की प्रत्येक (अल्लाहकडे) परतणाऱ्या दासाकरिता पाहण्याचे व समजण्याचे साधन व्हावे.
९. आणि आम्ही आकाशातून शुभ पाण्याचा वर्षाव केला आणि त्याद्वारे बागा आणि कापणी केल्या जाणाऱ्या शेताचे अन्न-धान्य निर्माण केले.
१०. आणि खजुरींचे उंच उंच वृक्ष, ज्यांचे गुच्छे एकावर एक आहेत.
११. दासांच्या आजिविकेकरिता आणि आम्ही पाण्याद्वारे मृत शहराला जिवंत केले. अशाच प्रकारे (कबरींमधून) निघायचे आहे.
१२. त्यांच्यापूर्वी नूहच्या जनसमूहाने आणि रस्सच्या निवासींनी आणि समूदच्या लोकांनी खोटे ठरविले होते.
१३. आणि आदने आणि फिरऔनने आणि लूतच्या बांधवांनी
१४. आणि आयकावाल्यांनी आणि तुब्बअच्या जनसमूहाने (देखील खोटे ठरविले होते) सर्वांनी पैगंबरांना खोटे ठरविले, तेव्हा माझा शिक्षेचा वायदा त्यांच्याकरिता खरा ठरला.
१५. काय आम्ही पहिल्यांदा निर्माण केल्याने थकलो? किंबहुना हे लोक नव्या जीवनाच्या संदर्भात संशयग्रस्त आहेत.
१६. आम्ही माणसाला निर्माण केले आहे आणि त्याच्या मनात जे विचार निर्माण होतात आम्ही त्यांना जाणतो,१ आणि आम्ही त्याच्या मुख्य शिरे (प्राण नाडी) पेक्षाही अधिक त्याच्या समीप आहोत.
____________________
(१) अर्थात मनुष्य जे काही लपवितो आणि मनात लपवून ठेवतो ते सर्व काही आम्ही जाणतो. ‘वस्वसा’ मनात येणाऱ्या विचारांना म्हटले जाते, ज्याचे ज्ञान त्या माणसाखेरीज दुसऱ्या कोणालाही निसते, परंतु अल्लाह या विचारांनाही जाणतो. यास्तव ‘हदीसे कुदसी’मध्ये उल्लेखित आहे, ‘‘माझ्या अनुयायींच्या मनात येणाऱ्या विचारांना अल्लाहने माफ केले आहे, अर्थात त्याबद्दल तो गुन्हेगार ठरविणार नाही, जोपर्यंत ते विचार आपल्या तोंडाने व्यक्त करीत नाही किंवा त्यानुसार आचरण करणार नाही.’’ (अल बुखारी, किताबुल ईमान बाबुइजा हनस नासियन फिल ऐमान, मुस्लिम बाबु तजाबुजिल्लाहि अन हदीसिन नफ्से वल ख्ततिरे बिल कल्बे इजालम तस्तकिर्र)
१७. जेव्हा दोन (नोंद) घेणारे जे घेतात, एक उजव्या बाजूला, आणि दुसरा डाव्या बाजूला बसला आहे.
१८. (मनुष्य) तोंडाने एखादा शब्द काढत नाही तोच त्याच्याजवळ रक्षक (पहारेकरी) तयार आहे.
१९. आणि मृत्युची मुर्छा सत्यासह येऊन पोहचली, हीच ती गोष्ट होय, जिच्यापासून तू पळ काढत होतास.
२०. आणि सूर फुंकला जाईल अज़ाब (शिक्षा-यातने) च्या वायद्याचा दिवस हाच आहे.
२१. आणि प्रत्येक मनुष्य अशा प्रकारे येईल की त्याच्यासोबत एक हाकणारा असेल आणि एक साक्ष देणारा.
२२. निःसंशय, तू यापासून बेसावध (गफलतीत) होता, परंतु आम्ही तुझ्या समोरून पडदा हटविला, तेव्हा आज तुझी नजर फार तीक्ष्ण आहे.
२३. त्याच्यासोबत राहणारे फरिश्ते म्हणतील, हा हजर आहे, जो की माझ्याजवळ होता.
२४. दोघे टाकून द्या जहन्नममध्ये प्रत्येक काफिर, उदंड(उध्दट) माणसाला.
२५. जो सत्कर्मांपासून रोखणारा, मर्यादा भंग करणारा आणि संशयी होता.
२६. ज्याने अल्लाहसोबत दुसरा माबूद (उपास्य) ठरवून घेतला होता, तेव्हा त्याला कठोर शिक्षा - यातनेत टाकून द्या.
२७. त्याचा साथीदार (सैतान) म्हणेल की हे आमच्या पालनकर्त्या! मी याला मार्गभ्रष्ट केले नव्हते, उलट हा स्वतःच दूरच्या मार्गभ्रष्टतेत होता.
२८. (अल्लाह) फर्माविल की, माझ्यासमोर वादविवाद करू नका. मी तर आधीच तुमच्याकडे शिक्षा - यातनेचा वायदा पाठविला होता.
२९. माझ्याजवळ गोष्ट बदलली जात नाही आणि ना मी आपल्या दासांवर (उपासकांवर) किंचितही अत्याचार करणारा आहे.
३०. ज्या दिवशी आम्ही जहन्नमला विचारू की काय तू (पूर्णतः) भरली? ती उत्तर देईल की, आणखी काही जास्त आहे का?
३१. आणि जन्नत, नेक सदाचारी लोकांसाठी अगदी जवळ केली जाईल किंचितही दूर नसेल.
३२. हे आहे, ज्याचा वायदा तुमच्याशी केला जात होता, अशा त्या प्रत्येक माणसासाठी, जो ध्यानमग्न आणि नियमित (आज्ञापालन) करणारा असेल.
३३. जो रहमान (दयावान अल्लाह) चे गुप्तपणे भय राखत असेल आणि रुजू होणारे हृदय घेऊन आला असेल.
३४. तुम्ही या जन्नतमध्ये शांतीपूर्वक दाखल व्हा. हा नेहमी राहण्याचा दिवस आहे.
३५. हे तिथे जे काही इच्छितील ते त्यांना मिळेल (किंबहुना) आमच्याजवळ आणखीही जास्त आहे.
३६. आणि त्यांच्यापूर्वीही आम्ही अनेक जनसमूहांना नष्ट करून टाकले आहे, जे त्याच्यापेक्षा शक्ती सामर्थ्यात खूप जास्त होते. ते शहरामध्ये फिरतच राहिले की एखादे पळ काढण्याचे स्थान आहे?
३७. यात, त्या प्रत्येक माणसाकरिता बोध उपदेश आहे, जो हृदय बाळगत असेल किंवा लक्षपूर्वक ऐकत असेल आणि तो हजर असेल.
३८. निःसंशय, आम्ही आकाशांच्या आणि धरतीच्या आणि त्या दोघांच्या दरम्यान जे काही आहे, ते सर्व (फक्त) सहा दिवसांत निर्माण केले, आणि आम्हाला थकव्याने स्पर्शही केला नाही.
३९. यास्तव तुम्ही त्या गोष्टींवर धीर-संयम राखा आणि आपल्या पालनकर्त्याचे पावित्र्यगान, प्रशंसेसह सूर्योदयापूर्वीही आणि सूर्यास्तापूर्वीही करीत राहा.
४०. आणि रात्रीच्या काही काळातही महिमागान करा आणि नमाजनंतरही.
४१. आणि ऐका की ज्या दिवसी एक पुकारणारा जवळच्या ठिकाणाहूनच पुकारेल.
४२. ज्या दिवशी तो भयंकर आवाज खात्रीपूर्वक ऐकतील, हा बाहेर पडण्याचा दिवस असेल.
४३. आम्हीच जिवंत करतो आणि आम्हीच मृत्यु देतो आणि आमच्याचकडे परतून यायचे आहे.
४४. ज्या दिवशी जमीन विदीर्ण होईल आणि हे धावत पळत (बाहेर पडतील) हे एकत्रित करणे आमच्यासाठी फार सोपे आहे.
४५. आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो, जे काही हे सांगत आहेत आणि तुम्ही त्यांना जबरदस्तीपूर्वक राजी करून घेणारे नाही, तेव्हा तुम्ही त्यांना कुरआनाच्या माध्यमाने समजावित राहा, जे माझ्या ताकीदीचे भय