surah.translation .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. काय आम्ही तुमची छाती (हृदय) उघड केली नाही?
२. आणि तुमच्यावरून तुमचे ओझे उतरविले.
३. ज्याने तुमची पाठ मोडून टाकली होती.
४. आणि आम्ही तुमची चर्चा बुलंद केली.
५. तेव्हा निश्चितच कठीणतेसह सहजता आहे.
६. निःसंशय, कठीणतेसह सहजता आहे.
७. तर, जेव्हा तुम्ही कामकाज आटोपून मोकळे व्हाल, तर तेव्हा (उपासनेत) मग्न व्हा.
८. आणि आपल्या पालनकर्त्याकडे मन लावा.