ترجمة سورة العاديات

الترجمة الماراتية
ترجمة معاني سورة العاديات باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. धापा टाकीत धावणाऱ्या घोड्यांची शपथ!
२. मग टाप मारून चिंगाऱ्या उडविणाऱ्यांची शपथ!
३. मग सकाळच्या वेळी हल्ला चढविणाऱ्यांची शपथ!
४. तर त्या वेळी धूळ उडवितात.
५. मग त्याचसोबत सैन्यांमध्ये घुसतात.
६. निःसंशय, मनुष्य आपल्या पालनकर्त्याशी मोठा कृतघ्न आहे.
७. आणि खात्रीने तो स्वतःही यावर साक्षी आहे.
८. आणि हा धनाच्या मोहातही मोठा सक्त (कठोर) आहे.
९. काय याला ती वेळ माहीत नाही जेव्हा कबरीमध्ये जे (काही) आहे, काढून घेतले जाईल.
१०. आणि मनातल्या गुप्त गोष्टींना उघड केले जाईल.
११. निःसंशय, यांचा पालनकर्ता त्या दिवशी यांच्या अवस्थेची पुरेपूर खबर राखणारा असेल.
Icon