surah.translation .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. आपल्या अति उच्च पालनकर्त्याच्या नावाची पवित्रता वर्णन करा.
२. ज्याने निर्माण केले आणि सही सलामत बनविले.
३. आणि ज्याने (यथायोग्य) अनुमान केले आणि मग मार्गदर्शन केले.
४. आणि ज्याने ताजे गवत उगविले.
५. मग त्याने ते (सुकवून) काळा केर - कचरा करून टाकले.
६. आम्ही तुम्हाला शिकवू, मग तुम्ही विसरणार नाही.
७. परंतु जे काही अल्लाह इच्छिल. निःसंशय, तो उघड आणि लपलेले सर्व काही जाणतो.
८. आणि आम्ही तुमच्यासाठी सहजता निर्माण करू.
९. तेव्हा तुम्ही उपदेश करीत राहा जर उपदेश काही लाभ देईल.
१०. (अल्लाहचे) भय बाळगणारा तर बोध ग्रहण करील.
११. तथापि दुर्दैवी, यापासून दूर पळेल.
१२. जो मोठ्या भयंकर आगीत दाखल होईल.
१३. जिथे मग तो ना मरेल, ना जगेल, (किंबहुना मरणासन्न स्थितीतच पडून राहील).
१४. निःसंशय, त्याने सफलता प्राप्त केली, जो स्वच्छ शुद्ध झाला.
१५. आणि ज्याने आपल्या पालनकर्त्याचे नाम स्मरणात ठेवले, आणि नमाज पढत राहिला.
१६. परंतु तुम्ही तर ऐहिक जीवनालाच प्राधान्य देता.
१७. आणि आखिरत (मरणोत्तर जीवन) अतिशय उत्तम निरंतर टिकून राहणारी आहे.
१८. या गोष्टीचे वर्णन पूर्वी (अवतरित झालेल्या) ग्रंथातही आहे.
१९. (अर्थात) इब्राहीम आणि मूसा यांच्या ग्रंथात.