ﯩ
surah.translation
.
من تأليف:
محمد شفيع أنصاري
.
ﰡ
१. हे ईमान राखणाऱ्या लोकांनो! माझ्या आणि आपल्या शत्रूंना मित्र बनवू नका. तुम्ही तर मित्रत्वाने त्यांच्याकडे संदेश पाठविता आणि ते त्या सत्याचा, जे तुमच्याजवळ येऊन पोहोचले आहे, इन्कार करतात, पैगंबराला आणि स्वतः तुम्हाला केवळ या कारणास्तव (देशाबाहेर) काढतात की तुम्ही आपल्या पालनकर्त्यावर ईमान राखतात. जर तुम्ही माझ्या मार्गात जिहाद (धर्मयुद्धा) करिता आणि माझ्या प्रसन्नतेच्या शोधात निघाले आहात (तर त्यांच्याशी मैत्री करू नका). तुम्ही त्यांच्याजवळ लपून छपून प्रेमसंदेश पाठविता, आणि मला चागल्या प्रकारे माहीत आहे, जे तुम्ही लपविले आणि तेही जे तुम्ही जाहीर केले. तुमच्यापैकी जो कोणी हे काम करील, तो निःसंशय सरळ मार्गापासून विचलित होईल.
२. जर त्यांनी तुमच्यावर काबू मिळविला तर ते तुमचे (उघड) शत्रू होतील आणि वाईटरित्या तुमच्यावर हात उचलू लागतील आणि अपशब्द बोलू लागतील आणि (मनापासून) इच्छितील की तुम्हीही कुप्र करू लागावे.
३. तुमचे नातेसंबंध आणि संतती तुम्हाला कयामतच्या दिवशी (काहीच) उपयोगी पडणार नाही. अल्लाह तुमच्या दरम्यान फैसला करील आणि तुम्ही जे काही करीत आहात अल्लाह ते चांगल्या प्रकारे पाहत आहे.
४. (हे ईमान राखणाऱ्यांनो!) तुमच्याकरिता (हजरत) इब्राहीम आणि त्यांच्या साथीदारांमध्ये फार उत्तम नमुना आहे, जेव्हा त्या सर्वांनी आपल्या जनसमूहाला स्पष्ट शब्दांत सांगितले की आम्ही तुमच्यापासून आणि ज्यांची तुम्ही अल्लाहखेरीज आराधना करता, त्या सर्वांपासून पूर्णपणे विभक्त आहोत. आम्ही तुमच्या (श्रद्धेचा) इन्कार करतो आणि तोपर्यंत तुम्ही अल्लाहच्या एक असण्यावर ईमान राखत नाही (तोपर्यंत) आमच्या व तुमच्या दरम्यान नेहमीकरिता कपट आणि शत्रुत्व निर्माण झाले. परंतु इब्राहीम आपल्या पित्यास असे म्हणाले होते की मी तुमच्यासाठी क्षमा-याचना अवश्य करीन आणि तुमच्यासाठी मला अल्लाहसमोर कसलाही अधिकार नाही. हे आमच्या पालनकर्त्या! तुझ्यावरच आम्ही भरवसा राखला आहे१ आणि तुझ्याचकडे आम्ही रुजू होतो, आणि तुझ्याकडेच परतून यायचे आहे.
____________________
(१) मूळ शब्द ‘तवक्कल’ (भरवसा) अर्थात बाह्य साधनांचा अवलंब केल्यानंतर मामला अल्लाहच्या हवाली केला जावा. भरवशाचा अर्थ हा नव्हे की साधनांचा प्रयोग न करताच अल्लाहवर भरवसा राखला जावा, असे करण्यापासून आम्हाल रोखले गेले आहे. एकाद एक मनुष्य पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या सेवेत हजर झाला आणि उंटाला तसेच बाहेर उभे करून आत आला. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी विचारले असता म्हणाला की मी उंटाला अल्लाहच्या हवाली करून आलो आहे. त्यावर पैगंबर म्हणाले, हा भरवसा नव्हे. ‘आकल व तवक्कल’ (‘‘आधी त्याला बांध, नंतर अल्लाहवर भरवसा कर.’’ (तिर्मिजी)
____________________
(१) मूळ शब्द ‘तवक्कल’ (भरवसा) अर्थात बाह्य साधनांचा अवलंब केल्यानंतर मामला अल्लाहच्या हवाली केला जावा. भरवशाचा अर्थ हा नव्हे की साधनांचा प्रयोग न करताच अल्लाहवर भरवसा राखला जावा, असे करण्यापासून आम्हाल रोखले गेले आहे. एकाद एक मनुष्य पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या सेवेत हजर झाला आणि उंटाला तसेच बाहेर उभे करून आत आला. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी विचारले असता म्हणाला की मी उंटाला अल्लाहच्या हवाली करून आलो आहे. त्यावर पैगंबर म्हणाले, हा भरवसा नव्हे. ‘आकल व तवक्कल’ (‘‘आधी त्याला बांध, नंतर अल्लाहवर भरवसा कर.’’ (तिर्मिजी)
५. हे आमच्या पालनकर्त्या! तू आम्हाला काफिरांच्या कसोटीत टाकू नको आणि हे आमच्या पालनकर्त्या! आमचे अपराध माफ कर. निःसंशय, तूच वर्चस्वशाली आणि हिकमतशाली आहेस.
६. निसंशय, तुमच्यासाठी त्या लोकांमध्ये उत्तम आदर्श (आणि चांगले अनुसरण आहे, विशेषतः) त्या प्रत्येक माणसाकरिता, जो अल्लाह आणि कयामतच्या दिवसाच्या भेटीवर विश्वास राखत असेल आणि जर कोणी तोंड फिरविल, तर अल्लाह पूर्णतः निःस्पृह आहे आणि महानता व प्रशंसेस पात्र आहे.
७. नवल नव्हे की अल्लाहने, लवकरच तुमच्या आणि त्यांच्या दरम्यान प्रेम निर्माण करावे.१ अल्लाह सर्व सामर्थ्य बाळगतो आणि अल्लाह मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे.
____________________
(१) अर्थात त्यांना मुस्लिम बनवून तुमचा बांधव आणि साथीदार बनवावे, ज्यामुळे तुमची आपसातील शत्रुता, मैत्रीत रुपांतर होईल आणि असेच घडले. मक्का विजयानंतर लोक समूहासमूहांनी इस्लाम धर्म स्वीकारू लागले आणि ते मुस्लिम होताच घृणाचे रूपांतर प्रेमात झाले. कालपर्यंत जे मुलसमानांचे रक्तपिपासू वैरी होते, ते त्यांचे जीवश्च कंठश्च बनले.
____________________
(१) अर्थात त्यांना मुस्लिम बनवून तुमचा बांधव आणि साथीदार बनवावे, ज्यामुळे तुमची आपसातील शत्रुता, मैत्रीत रुपांतर होईल आणि असेच घडले. मक्का विजयानंतर लोक समूहासमूहांनी इस्लाम धर्म स्वीकारू लागले आणि ते मुस्लिम होताच घृणाचे रूपांतर प्रेमात झाले. कालपर्यंत जे मुलसमानांचे रक्तपिपासू वैरी होते, ते त्यांचे जीवश्च कंठश्च बनले.
८. ज्या लोकांनी तुमच्याशी धर्माच्या संदर्भात युद्ध केले नाही आणि तुम्हाला देशाबाहेर काढले नाही, त्यांच्याशी सद्व्यवहार उपकाराचे व न्यायपूर्ण वर्तन करण्यापासून अल्लाह तुम्हाला रोखत नाही. (किंबहुना) निःसंशय, अल्लाह न्याय करणाऱ्यांशी प्रेम राखतो.
९. अल्लाह तुम्हाला केवळ त्या लोकांशी प्रेम राखण्यापासून रोखतो, ज्यांनी तुमच्याशी धर्माच्या बाबतीत लढाई केली आणि तुम्हाला देशाबाहेर काढले आणी देशाबाहेर काढणाऱ्यांना मदत केली, जे लोक अशा काफिरांशी प्रेम राखतील तेच निश्चितपणे अत्याचारी आहेत.
१०. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुमच्याजवळ ईमान राखणाऱ्या स्त्रिया देशत्याग करून येतील, तेव्हा तुम्ही त्यांची परीक्षा घेत जा. वस्तुतः त्यांच्या ईमानास चांगल्या प्रकारे जाणणारा तर अल्लाहच आहे, परंतु जर त्या तुम्हाला ईमान राखणाऱ्या वाटतील, तर मग तुम्ही त्यांना काफिरांकडे परत पाठवू नका. या त्यांच्यासाठी हलाल (वैध) नाहीत आणि ना ते यांच्यासाठी हलाल आहेत, आणि जो काही खर्च त्या काफिरांनी केला असेल, तो त्यांना देऊन टाका, त्या स्त्रियांना त्यांचा महर अदा करून त्याच्याशी विवाह करून घेण्यात तुमच्यावर कसलाही गुन्हा नाही. आणि काफिर स्त्रियांच्या विवाहबंधनास आपल्या कब्जात ठेवू नका आणि जो काही खर्च तुम्ही केला असेल तो मागून घ्या आणि जो काही खर्च त्या काफिरांनी केला असेल, तो त्यांनीही मागून घ्यावा. हा अल्लाहचा फैसला आहे, जो तुमच्या दरम्यान करीत आहे आणि अल्लाह जाणणारा (आणि) हिकमत बाळगणारा आहे.
११. आणि जर तुमची एखादी पत्नी तुमच्या हातून निघून जावी आणि काफिरांजवळ चालली जावी, मग तुम्हाला सूडाची संधी (वेळ) मिळावी तर ज्यांच्या पत्न्या चालल्या गेल्या आहेत, त्यांना त्यांच्या खर्चाइतके अदा करा, आणि त्या अल्लाहचे भय बाळगत राहा ज्यावर तुम्ही ईमान राखता.
१२. हे पैगंबर! जेव्हा ईमान राखणाऱ्या स्त्रिया तुमच्याशी या गोष्टींवर बैअत (प्रतिज्ञा) करण्यासाठी येतील की त्या अल्लाहसोबत दुसऱ्या कोणाला सहभागी बनविणार नाहीत, चोरी करणार नाहीत, व्यभिचार करणार नाहीत, आपल्या संततीची हत्या करणार नाहीत आणि ना असा एखादा आक्षेप ठेवतील जो स्वतः आपल्या हाता-पायांसमोर रचून घ्यावा आणि एखाद्या नेकीच्या कामात तुमची अवज्ञा करणार नाहीत तर तुम्ही त्यांच्याकडून बैअत करून घेत जा आणि त्यांच्यासाठी अल्लाहकडे क्षमा-याचना करा. निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा दयावान आहे.
१३. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही त्या लोकांशी मैत्री ठेवू नका, ज्यांच्यावर अल्लाहचा प्रकोप आलेला आहे, जे आखिरतपासून अशा प्रकारे निराश झाले आहे ज्या प्रकारे मृत कबरीवाल्यांपासून, काफिर निराश आहेत.