ترجمة سورة الفاتحة

الترجمة الماراتية
ترجمة معاني سورة الفاتحة باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية .
من تأليف: محمد شفيع أنصاري .
१. अल्लाहच्या नावाने आरंभ करतो, जो मोठा कृपावान आणि अतिशय दया करणारा आहे.
२. सर्व स्तुति - प्रशंसा अल्लाहकरिता आहे, जो समस्त विश्वाचा पालनहार १ आहे.
____________________
(१) मूळ शब्द ‘रब्ब’ अल्लाहच्या शुभ नामांपैकी एक नाम आहे. ज्याचा अर्थ प्रत्येक चीज वस्तूला निर्माण करून तिच्या गरजा पूर्ण करणारा आणि तिला परिपूर्ण दर्जापर्यंत पोहचविणारा.
३. मोठा कृपावान, अतिशय दया करणारा आहे.
४. मोबदल्याच्या दिवसा (कयामत) चा स्वामी आहे.
५. आम्ही तुझीच उपासना करतो आणि तुझ्याकडेच मदतीची याचना करतो.
६. आम्हाला सरळ (सत्य) मार्ग दाखव. १
____________________
(१) ही सरळ मार्गाची व्याख्या आहे की असा सरळ मार्ग, ज्यावर ते लोक चालले, ज्यांच्यावर तुझ्या कृपा - देणग्यांचा वर्षाव झाला. अर्थात हा समूह पैगंबर, शहीद, सिद्दीक आणि नेक (सत्कर्मी, सदाचारी) लोकांचा आहे.
७. अशा लोकांचा मार्ग, ज्यांच्यावर तू कृपा केली, त्या लोकांचा नव्हे, ज्यांच्यावर तुझा प्रकोप झाला आणि ना मार्गभ्रष्ट झालेल्यांचा.
Icon