ترجمة سورة الفجر

الترجمة الماراتية
ترجمة معاني سورة الفجر باللغة الماراتية من كتاب الترجمة الماراتية .
من تأليف: محمد شفيع أنصاري .

१. शपथ आहे प्रातःकाळची!
२. आणि दहा रात्रींची!
३. आणि सम आणि विषम संख्येची!
४. आणि रात्रीची जेव्हा ती निघू लागावी!
५. काय यात बुद्धिमानांसाठी पुरेशी शपथ आहे?
६. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने आदच्या लोकांशी काय व्यवहार केला?
७. मोठमोठे खांब बनविणाऱ्या इरमशी.
८. ज्यांच्यासारखा (कोणताही जनसमूह) अन्य भूभागात निर्माण केला गेला नाही.
९. आणि समूदच्या लोकांशी, ज्यांनी दऱ्या-खोऱ्यात मोठमोठे पाषाण कोरले होते.
१०. आणि फिरऔनशी, जो मेखा बाळगणारा होता.
११. या सर्वांनी धरतीवर उपद्रव पसरविला होता.
१२. आणि खूप उत्पात (फसाद) माजविला होता.
१३. शेवटी तुमच्या पालनकर्त्याने या सर्वांवर अज़ाबचा आसूड बरसविला.
१४. निःसंशय, तुमचा पालनकर्ता लक्ष ठेवून आहे.
१५. माणसा (ची ही दशा आहे की) जेव्हा त्याचा पालनकर्ता त्याची परीक्षा घेतो, आणि त्याला मान प्रतिष्ठा व कृपा देणग्या प्रदान करतो तेव्हा तो म्हणू लागतो की माझ्या पालनकर्त्याने मला सन्मानित केले.
१६. आणि जेव्हा तो (अल्लाह) याची कसोटी घेतो, त्याची आजिविका तंग (कमी) करून टाकतो, तेव्हा तो म्हणू लागतो की माझ्या पालनकर्त्याने माझी अव्हेलना केली (आणि मला अपमानित केले).
१७. असे मुळीच नाही किंबहुना (खरी गोष्ट अशी) की तुम्ही लोक अनाथाचा मान-सन्मान राखत नाही.१
____________________
(१) अर्थात अनाथाशी चांगले वर्तन राखत नाही, ज्यास तो पात्र आहे. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या संदर्भात फर्मावितात की ते घर सर्वांत उत्तम आहे, ज्यात अनाथाशी चांगला व्यवहार केला जात असेल आणि ते घर सर्वांत वाईट आहे, ज्यात अनाथाशी वाईट व्यवहार केला जात असेल. मग आपल्या बोटांकडे इशारा करून फर्माविले की मी आणि अनाथाचे पालनपोषण करणारा जन्नतमध्ये अशा प्रकारे सोबत राहू, जशी ही दोन बोटे मिळालेली आहेत. (अबू दाऊद, किताबुल अदब, बाबुन फी जम्मिल यतीमे)
१८. आणि गरिबांना जेवू घालण्याचे एकमेकांना प्रोत्साहन देत नाही.
१९. आणि (मेलेल्यांची) वारस संपत्ती गोळा करून खातात.
२०. आणि धन-संपत्तीशी जीवनापाड प्रेम राखता.
२१. निःसंशय, जमिनीला जेव्हा कुठून कुठून तिला अगदी सपाट केले जाईल.
२२. आणि तुमचा पालनकर्ता (स्वतः) प्रकट होईल आणि फरिश्ते रांगा बांधून (येतील).
२३. आणि ज्या दिवशी जहन्नमलाही आणले जाईल त्या दिवशी माणूस बोध ग्रहण करील. परंतु आता त्याच्या बोध ग्रहण करण्याचा काय लाभ?
२४. तो म्हणेल की मी आपल्या या जीवनाकरिता काही सत्कर्मे, पहिल्यापासून करून ठेवली असती तर फार बरे झाले असते.
२५. तर आज अल्लाहच्या शिक्षा - यातनेसारखी शिक्षा - यातना अन्य कोणाचीही नसेल.
२६. ना त्याच्या बंधनासारखे कोणाचे बंधन असेल.
२७. हे संतुष्ट आत्मा!
२८. तू आपल्या पालनकर्त्याकडे परत चल, अशा अवस्थेत की तू त्याच्याशी राजी, तो तुझ्याशी प्रसन्न.
२९. तेव्हा, माझ्या खास दासांमध्ये सामील हो.
३०. आणि माझ्या जन्नतमध्ये प्रवेश कर.
Icon